अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा २०२१ मध्ये आलेला पुष्पा चित्रपट चांगलाच गाजला. हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नडा, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पुष्पा या चित्रपटातील ‘सामी सामी’ हे गाणे सुपरहिट झाले. लोकांनी सामी सामी या गाण्याला चांगलीच पसंती दिली.

पुष्पा फेम रश्मिका मंदानीला हल्लीच सुपरस्टार गोविंदा यांना भेटायला मिळाले. रश्मिका आणि गोविंदाची जुगलबंदी प्रेक्षकांना फारच आवडली. दोघांनी मिळून सामी सामी या गाण्यावर एकत्र डान्स देखील केला. ९० च्या दशकातील एवरग्रीन हिरो गोविंदा आज देखील असे नाचत होते की, बघणारा दंग राहील. गोविंदाचा हा उत्साह पाहून आजही ते तितक्याच जोशात कोणत्याही गाण्यावर नाचू शकतात हे कळले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी तर ही पर्वणीच होती.

रश्मिका आणि गोविंदाच्या डान्स ने थिरकला स्टेज  – डी आय डी मॉम’ या शोमध्ये गोविंदा आणि रश्मिकाला पाहुणे परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. पुष्पा या चित्रपटातील सामी सामी हे गाणे फारच गाजले याच गाण्यावर गोविंदा आणि रश्मिकाने स्टेजवर एकत्र डान्स केला. डान्स करताना दोघेही तितकेच एनरजेटीक दिसत होते.

फॅन्सना आता लागलीय पुष्पा २ ची उत्सुकता- पुष्पा चित्रपट आल्यापासून आता प्रेक्षकांना पुष्पा २ कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग तर सुपरहिट झाला होता येणाऱ्या दुसऱ्या भागात देखील रश्मिका आपल्या अदांनी सगळ्या फॅन्सना घायाळ करेल यात काही शंकाच नाही. साऊथ इंडिया मधील अभिनेत्री रश्मिका मंदानीने आता हिंदी चित्रपट सृष्टीत देखील पदार्पण केले आहे.

बिग बी सोबत रश्मिकाचा नवीन चित्रपट- रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘गुडबाय’ या चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटाचा ट्रेलर हल्लीच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

रश्मिका जेव्हा पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांना भेटली होती तेव्हा ती त्यांची देहबोली त्यांचा औरा पाहूनच प्रभावीत झाली होती असे तिने एका इंटरव्हूमध्ये सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *