ऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक मोठे नाव आहे. आजपर्यंत ऐश्वर्याने एक नाही दोन नाही तर कित्येक हिट चित्रपट दिले आहेत, आणि यातूनच तिने सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. आपल्या अभिनयाने ऐश्वर्याने संपूर्ण सिने जगताला वेडे केले आहे. ऐश्वर्याने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये तिचे नाव कायम ठेवले आहे.

ऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रिमधील एक नावाजलेले नाव आहे. १९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्ड चा किताब देखील जिंकला होता. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्या सोबत लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर ऐश्वर्या, ऐश्वर्या राय बच्चन झाली.

बॉलिवूडमध्ये जेव्हा कोणत्याही सुंदर जोडीचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यांच्याच्या मनात पहिले नाव हे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे येते. आपण या आधीही पाहिले असेल ऐश्वर्या आणि अभिषेक नेहमीच लोकांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली देत असतात. पण हल्ली ऐश्वर्याने केलेल्या स्टेटमेंटमूळे ती चर्चेत आहे जे स्टेटमेंट अभिषेक बच्चन बद्दल आहे.

‘धूम २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांच्या जवळ आले. यानंतर त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि २००७ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. ऐश्वर्या रायने हल्लीच त्या दोघांच्या वयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या.

ऐश्वर्या म्हणाली, “अभिषेकने अचानक तिला प्रपोज केला होता, तिच्याकडे विचार करण्यासाठी वेळ सुद्धा नव्हता. धूम २ च्या शूटिंग दरम्यान आम्ही एकमेकांच्या एवढे जवळ आलो होतो की, त्यांनी मला डायरेक्ट प्रपोज केलं.”

ऐश्वर्याने पुढे सांगितले, “मला अभिषेक बद्दल कोणतीच तक्रार नाही आहे. तो माझी खूप काळजी घेतो. पण बोलता बोलता ऐश्वर्याने सांगितले अभिषेक चिडल्यावर त्याला मानवणं फार कठीण आहे. रोमान्सच्या बाबतीत तर त्याचा कोणी हातच पकडू शकत नाही.

तो माझी खूप काळजी घेतो. आपल्या लग्नानंतरची आठवण सांगताना ऐश्वर्याने असे सांगितले की, “अभिषेकने बेडचे सगळे स्क्रू काढले होते मी जशी बेडवर बसली तशी धाडकन खाली पडली त्यानंतर मी दोन दिवस त्याच्यासोबत बोलले नव्हते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *