सुशांत सिंग राजपूत च्या “दिल बेचारा” चित्रपटाने एवेंजर्स एंडगेम’चे मोडले सर्व रेकॉर्ड ! ट्रेलरने मिळवल्या इतक्या व्ह्यूज ?

452

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. युट्यूबवर फॅन्स या ट्रेलरवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सुशांतच्या ट्रेलर 24 तासांमध्ये सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला ट्रेलर आहे. खास गोष्ट म्हणजे, सुशांतच्या या चित्रपटाच्या ट्रेलरने फक्त बॉलिवूडचेच नाहीतर, हॉलिवूडच्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.

सुशांतच्या चित्रपटाच्या ट्रेलरला युट्यूबवर सर्वाधिक लाइक्स मिळाले आहेत. ‘दिल बेचारा’च्या ट्रेलरने मार्वल स्टुडिओजच्या ‘एवेंजर्स एंडगेम’चा ट्रेलरलाही मागे टाकलं आहे. एंडगेमच्या ट्रेलरला आतापर्यंत 3.2 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. तर दिल बेचाराच्या ट्रेलरला आतापर्यंत 7.2 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. कोणत्याही चित्रपटाच्या ट्रेलरला एवढे लाईक्स मिळणं म्हणजे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार मोठी गोष्ट आहे.

बॉलिवूड स्टार्सलाही टाकलं मागे

सुशांतचा चित्रपट दिल बेचारा या चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांमध्ये जवळपास 7 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. तसेच सुपरस्टार ऋतिक रोशनचा चित्रपट ‘सुपर 30’चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1.4 मिलियन लाईक्स मइळाले आहेत. तसेच आलिया भट्टचा चित्रपट राजीच्या ट्रेलरला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. सारा अली खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेला ‘लव आजकल’च्या ट्रेलरला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट ‘स्ट्रीट डांसर 3 डी’च्या ट्रेलरला जवळपास 9 लाख लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर 6 जुलै रोजी दुपारी लॉन्च करण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल असं सांगण्यात आलं होतं. डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवरही सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहून त्याला श्रद्धांजली द्यावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य झालं नाही. या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. खरंतर हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे तो लांबणीवर पडला. आता हा चित्रपट 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे.