सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेने चाहत्यांचा उच्चांक गाठला आहे. या मालिकेतील सडेतोड सिद्धी आणि रांगडा पण साधा भोळा शिवा यांची जोडी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडते. या मालिकेत सिद्धीची भूमिका अभिनेत्री विदुला चौगुले ने साकारली आहे तर शिवा ही भूमिका अभिनेता ‘अशोक फलदेसाई’ने साकारली आहे. सध्या सिद्धी शिवा ची ही जोडी मराठी टीव्ही इंडस्ट्रीत चांगलीच गाजत आहे.
या मालिकेची कथा रुद्रायत गावाभोवती फिरते. त्यामुळे या मालिकेतील बोलीभाषा थोडीफार साताऱ्या-सांगली कडील ढंगात पेश केली जाते. या मालिकेचे कथालेखन अभिनेता-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने केले आहे.
मालिकेत ग्रामीण भागात राहणारी सिद्धी शिवा ची जोडी दाखवली जात असली तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ते दोघेही खुपच मॉर्डन आहेत. आज आम्ही तुम्हाला तुमच्या लाडक्या सिद्धी आणि शिवाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. सिद्धी म्हणजेच अभिनेत्री ‘विदुला चौगुले’ ही मूळची कोल्हापूरची आहे. सिद्धी चा जन्म ७ डिसेंबर २००२ मध्ये झाला त्यानंतर तिने कोल्हापुरातील हनुमंतराव चाटे या शाळेमध्ये शिक्षण घेतले. विदुलाला तिसरीत असल्यापासून अभिनय करण्याचे वेड लागले होते त्यामुळे तिने बालपणापासूनच अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. मात्र अभिनयातील खरा ब्रेक तिला कलर्स वाहिनीवरील जीव झाला येडा पिसा या मालिकेने दिला.
तिच्याबद्दल विशेष बोलायचे झाल्यास विदुला दहावीत असताना या मालिकेची ऑफर आली होती. आणि दहावीच्या परीक्षेच्या आसपास या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले होते. विदुलाला एक सख्खी मोठी बहीण असून तिच्या बहिणीचे नाव वैदही चौगुले असे आहे. वैदेहीने पाच वर्षे आर्किटेक्चर चे शिक्षण घेतले त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ती आता ऑस्ट्रेलियामध्ये असते. विदुलाने कोल्हापूरच्या शिंदे थिएटर अकॅडमी मधून अभिनयाचे धडे घेतले. तसेच तिने शोभा फिल्म प्रोडक्शन च्या डाग या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते शिवाय अनेक बाल नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने अनेक पुरस्कार मिळवले. हे झाले विदुला बद्दल. आता आम्ही तुम्हाला शिवा बद्दल थोडी माहिती देणार आहोत.
शिवा म्हणजेच अभिनेता अशोक फलदेसाई हा मूळचा गोव्याचा आहे. गोव्यामधील मरिनाच्या सरकारी शाळेत त्याने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने हनूस थिएटर ट्रेनिंग सेंटर ड्रामा स्कूल मधून अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर पुण्यातील ललित कला केंद्र मधून मास्टर ऑफ आर्ट्स केले. अशोक त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये सुद्धा अनेक नाटके व एकांकिकेमध्ये भाग घ्यायचा. सध्या तो कामानिमित्त मुंबईला राहतो. इंडियन माईम थेटर आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर यांनी एकत्रित आयोजित केलेल्या नॅशनल माईम फेस्टिवल मध्ये अशोक ने भाग घेतला होता. थिएटरमध्ये बराच काळ काम केल्यानंतर त्याच्या कामाचे चीज झाले आणि २०१९ मध्ये आलेल्या कलर्स मराठी वरील जीव झाला येडा पिसा या मालिकेतून त्याला पहिला ब्रेक मिळाला.
या आहेत विदुला आणि अशोक बद्दलच्या काही मजेदार गोष्टी-
अभिनेत्री विदुला चौगुले ची उंची पाच फूट सहा इंच आहे. आधी सांगितल्याप्रमाणे विदुला च्या दहावीच्या परीक्षेच्या काळातच तिला जीव झाला येडा पिसा या मालिकेची ऑफर आली होती. विदुलाला अभिनय क्षेत्रात आवड असल्यामुळे तिला समोरून चालून आलेली ही सोन्याची संधी गमवायची नव्हती म्हणून तिने या मालिकेस हो म्हटले. मात्र त्यामुळे तिला मार्च महिन्यात होणाऱ्या दहावीच्या बोर्डाची परीक्षा देता आली नव्हती.
मात्र नंतर जुलै महिन्यात ती पुन्हा एकदा परीक्षेत बसली आणि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. विदुलाने सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंगची राज्यस्तरीय स्कॉलरशिप पटकावली आहे. विशेष म्हणजे खूप कमी कालावधीत तिने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वर एक लाखांहून अधिक फॉलोवर्स मिळवले. विदुलाला अभिनयाव्यतिरिक्त डान्स आणि स्विमिंग करायला खूप आवडते. मालिकेत शिवाची पिळदार शरीरयष्टी पाहून त्याला फिटनेसची किती आवड असेल हे वेगळे सांगायला नको. या मालिकेसाठी अशोकने आठ किलो वजन वाढवले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *