बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून ला मुंबईतील वांद्रे मधील राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली होती. या आ*त्म*ह*त्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण होतील मात्र तरीही या प्रकरणाबाबत ती आ*त्म*ह*त्या आहे की ह*त्या हे प्रश्न उभे आहेत. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस व बिहार पोलिसांसोबत सीबीआय आणि ईडीसुद्धा करत आहे. सध्या या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत असून नुकतेच सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती भोवती सध्या संशयाचे फा*से घोंगावत आहेत. सध्या या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे जात असल्याचे दिसते. आता अजून एक नवीन खुलासा समोर आला आहे. सुशांत चे वडील केके सिंह हे सतत श्रुती मोदी अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. याबाबतचा खुलासा त्यांच्या व्हाट्सअप चॅटमुळे समोर आला.
या चॅट वरून स्पष्ट जाणवते की सुशांत चे वडील रिया व श्रुतीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. चॅट वरून समजते की सुशांतवर कोणतेतरी इलाज चालू होते मात्र याबाबत सुशांतच्या परिवाराला कोणतीच माहिती नव्हती. सुशांत च्या वडिलांनी रियाला केलेल्या मेसेज मध्ये लिहिले आहे की, मी सुशांतचे वडील आहे हे समजल्यापासून तू माझ्याशी बोलत का नाहीस. मला फोन कर. पुढे त्यांनी मेसेज मध्ये लिहिले की, एक मैत्रीण म्हणून तू सुशांतचा सांभाळ करीत आहेस, त्याच्यावर इलाज करत आहेस. पण एक वडील म्हणून माझे कर्तव्य आहे की त्याच्यावर कोणते इलाज चालू आहेत याबाबत माहिती असावी. यासाठी प्लीज मला फोन कर आणि मला याबाबत माहिती दे. तसेच सुशांतच्या वडिलांनी सुशांतची फायनान्स मॅनेजर श्रुती मोदीला सुद्धा मेसेज केले होते त्या मेसेजमध्ये सुशांतच्या वडिलांनी लिहिले की, मला माहित आहे सुशांतचे सर्व कर्ज तसेच त्याची सुद्धा तू देखभाल करतेस. तो सध्या कोणत्या स्थितीत आहे याबाबतीत मला तुझ्याशी बोलायचे आहे. माझे सुशांत शी बोलणे झाले होते त्यावेळी तो मला म्हणाला की तो खूप हैराण झाला आहे. त्यामुळे याबाबत मला तुझ्याशी बोलायचे आहे. जर तुला माझ्याशी बोलायचे नसेल तर मला मुंबईला यायचे आहे माझे विमानाचे तिकीट बुक कर.
सुशांत च्या आ*त्म*ह*त्या प्रकरणात अजून एक नवा खुलासा झाला आहे तो म्हणजे सुशांतच्या नावावर रजिस्टर असलेल्या कंपनीचा आयपी ऍड्रेस सतत बदलला जात आहे. नवी मुंबईतील या कंपनीचे सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती डायरेक्टर होते. या कंपनीचा आयपी ऍड्रेस २३ जून २०२० पासून ते ७ ऑगस्ट पर्यंत तीन वेळा बदलला गेला.
आतापर्यंत या कंपनीचा आयपी ऍड्रेस १७ वेळा बदलला गेला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणात एक्सपर्टस् चे म्हणणे आहे की कोणत्याही कंपनीचा आयपी ऍड्रेस इतक्या वेळा बदलला जात नाही. त्यामुळे ही गोष्ट साधारण नाही. जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करायचे असतात त्यावेळेस असे आयपी ऍड्रेस बदलले जातात. त्यामुळे याबाबत अनेक वेगवेगळे प्रश्न उठत आहेत. सोबतच मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा सध्या बोट ठेवले जात आहे. बिहार सरकारच्या मागणीनंतर या प्रकरणाबाबत सीबीआय तपासाला मान्यता दिली गेली. त्यामुळे लवकरच या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय’ची टीम मुंबईत येण्याची शक्यता आहे.