बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून ला मुंबईतील वांद्रे मधील राहत्या घरी गळफास लावून आ*त्म*ह*त्या केली होती. या आ*त्म*ह*त्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण होतील मात्र तरीही या प्रकरणाबाबत ती आ*त्म*ह*त्या आहे की ह*त्या हे प्रश्न उभे आहेत. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस व बिहार पोलिसांसोबत सीबीआय सुद्धा करत आहे. सध्या या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहे. या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा सर्वतोपरी तपास होत असताना आता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे च्या रिलेशन बाबत तपास व्हावा अशी मागणी केली जात आहे. एवढे एकमेकांवर प्रेम करत असताना सुशांत व अंकिता कोणत्या कारणामुळे वेगळे झाले याचा सुद्धा तपास व्हावा अशी मागणी सध्या होत आहे.
सुशांत आणि अंकिताचे नाते ६ वर्ष टिकले. सुशांतने नॅशनल टीव्हीवर अभिनेत्री अंकिता लोखंडे ला प्रपोज केले होते. त्याकाळी टीव्ही इंडस्ट्रीमधील त्यांची जोडी टॉपच्या जोड्यांपैकी एक मानली जायची. मानव आणि अर्चना ही जोडी प्रेक्षकांना एकेकाळी नेहमीच हवीशी वाटायची. या जोडीने इतकी लोकप्रियता मिळवली की लोक त्यांना त्यांचे खरे नाव सोडून मानव अर्चना म्हणूनच हाक मारायचे.

अंकिता व सुशांतने एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये एकत्र काम केले. असे म्हटले जाते की या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सुशांत व अंकिता एकमेकांच्या जवळ आले होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सुशांत आणि अंकिता ने डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये पार्टिसिपेट केले होते. या रियालिटी शोमध्ये सुशांतने सर्वांसमोर अंकिता लोखंडे ला प्रपोज केले. त्याकाळी त्यांचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी सुशांत व अंकिता नेहमीच एकत्र दिसायचे. असे म्हटले जात होते की ते दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
मात्र नंतर जेव्हा सुशांतने टीव्ही इंडस्ट्री सोडून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्या दोघांच्या नात्यामधील तणाव वाढल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांच्या ब्रेकअप चे खरे कारण कधीच समोर आले नाही मात्र असे म्हटले जाते की त्या दोघांमध्ये खूप भांडणे होऊ लागली होती. सुशांत व अंकिता चे एकमेकांना भेटण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले होते.अशी सुद्धा बातमी आली की अंकिताच्या अभिनय सोडण्याच्या निर्णयावर सुशांत नाखूष होता. सुशांतला नेहमी अंकिता ने काम करावे आणि त्यात यशस्वी व्हावे असे वाटायचे. अंकिताने सुद्धा कधीच त्यांच्या ब्रेकअप बद्दल सांगितले नसले तरीही अजून एक खबर होते की, त्याकाळी सुशांतने छोटा पडदा सोडून मोठ्या पडद्यावर यश संपादन करण्यास सुरुवात केली होती. मात्र पवित्र रिश्ता ही मालिका संपल्यावर अंकिता कडे दुसरे कोणतेच प्रोजेक्ट नव्हते. त्याच वेळी होणाऱ्या सुशांतच्या बाबतीतील लिंकअपच्या चर्चा अंकिताला खूप त्रास देऊ लागल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस अंकिता सुशांत व तिच्या नात्याच्या बाबतीत खूपच हळवी होऊ लागली होती.
पुढे याच कारणांमुळे त्यांच्यात भांडणे वाढू लागली. अंकिता जेव्हा सुशांतला कोणत्या को स्टार किंवा इतर मुलीं बरोबर पहायची तेव्हा तिला खूप राग यायचा. याशिवाय असेही म्हटले जाते की, अभिनेत्री परिणीती चोप्रा सोबतची मैत्री आणि अभिनेत्री क्रिती सेनोन सोबत वाढत जाणारी जवळीक सुशांत व अंकिताच्या वेगळे होण्यामागचे एक मोठे कारण ठरली. त्यानंतर दोघेही वेगळे झाले पण कधीच एकमेकांवर आरोप केले नाहीत. दरम्यान अंकिताने सुद्धा एका चित्रपटात काम केले. त्या वेळी शुभेच्छा देण्यासाठी सुशांतने तिला मेसेज केला होता. जेव्हा त्या वेळी याबाबत अंकिता ला विचारले गेले होते त्यावेळी ती म्हणाली होती की, एक्स मित्र सुद्धा असू शकतात. फक्त त्यांचा इतिहास काय आहे त्याच्यावर सर्व अवलंबून असते. याचा हाच अर्थ होतो की सुशांत व अंकिता मध्ये पुढे काहीही होणे संभव नव्हते. अंकिताला सुद्धा त्याबाबत कोणताच फरक पडत नव्हता. परंतु त्यांच्या चाहात्यांना त्या दोघांनी एकत्र यावे असे नेहमीच वाटत होते मात्र अंकिता व सुशांत दोघेही आपापल्या मार्गावर खूप पुढे गेले होते.
अंकिताला जेव्हा तिच्या व सुशांतच्या ब्रेकअप बद्दल विचारले होते त्यावेळेस ती म्हणाली, त्या गोष्टीला खूप काळ उलटून गेला आहे त्यामुळे आता या गोष्टीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. मला याबाबत काहीच फरक पडत नाही असे बोलणे मला जरी सोपे वाटत असले तरीही ते चुकीचे ठरेल.परंतु सुशांत अंकिता पासून दूर झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोबत रिलेशन मध्ये राहू लागला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *