जीवनामध्ये आपल्या आसपास अनेक अशा गोष्टी घडत असतात किंवा आपण त्या गोष्टी उघड्या डोळ्याने पाहत असतो तरीही बहुतेक वेळा त्यांना कानाडोळा करत असतो. अनेक गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये कुतुहूल असते परंतु आपण ते जाणून घेण्यास पुढे सरसावत नाही म्हणूनच आज आम्ही आपणास एका गमतीशीर पण नेहमी आपल्याला पाहायला मिळणाऱ्या गोष्टी बद्दल सांगणार आहोत. जेव्हा आपण पक्षांना विजेच्या तारांवर बसलेले पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे या पक्षांना शॉक का नाही लागत. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या संदर्भातच सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल.
तर तुम्ही सारे रोजच पाहत असाल की घरासमोर किंवा अन्य ठिकाणी बहुतेक संख्यांमध्ये पक्षी विजेच्या तारांवर बसलेले असतात. आपणास सांगू इच्छितो की, आपल्याला माहिती असलेल्या प्रत्येक वस्तूचे कार्य करण्याचे स्वतःचे असे काही विशिष्ट नियम असतात आणि त्या नियमांवर ते कार्य करत असते. आपल्याला हे माहिती असेल की, इलेक्ट्रॉन ताऱ्याच्या सहाय्याने पुढे सरकतात आणि त्यांची गती वाढते आणि आपल्या घराच्या आत करंटच्या स्वरूपात पोहचतात. काही लोक आपल्या घरांमध्ये एक अर्थिंग तार लावून ठेवतात तसेच या प्रकाराने अशा पद्धतीने एक पुर्ण सर्किट पूर्ण झाल्यावर बल्ब जळतो आणि पंखे इत्यादी सुरू होतात.
पक्षांना का नाही लागत शॉक? त्यामागील कारण जाणून घेण्याच्या आधी विजेच्या प्रवाह बाबतीत असलेल्या नियमांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. विजेच्या तारांमध्ये अनेक इलेक्ट्रॉन्स असतात. जे एका जागेवरून दुसर्‍या जागेवर गतिमान होत असतात. केव्हाही हे इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जातात तेव्हा या तारे मध्ये विजेचा प्रवाह निर्माण होतो. आपणास सांगू इच्छितो की, विजेच्या प्रवाहाचे दोन मार्ग आहेत, तेव्हा नेहमी त्या मार्गाने प्रवाहित होईल जेथे कोणताच अवरोध नसणार जेव्हा विजेचा प्रवाह असतो तो तांबे या धातूशी असतो. तज्ज्ञ मंडळी यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष्यांच्या शरीराची कोशिका आणि ऊती, तांब्याच्या तारेच्या तुलनेत अधिक प्रतिरोध निर्माण करतात.
एक कारण हे सुद्धा आहे की, चिमणी एका सोबतच जमीन आणि तार यांच्या संपर्कात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्यांना शॉक बसू शकणार नाही. जमिनीशी संपर्क झाल्यावर अर्थिंग त्यामुळे सर्किट पूर्ण होऊन जाते तसेच त्यांच्या शरीरातून विजेचा प्रवाह होत असतो. हीच गोष्ट मनुष्याच्या बाबतीत सुद्धा घडत असते, जेव्हा कधी तो विजेच्या तारेला स्पर्श करतो आणि त्याचे पाऊल जमिनीवर असते तेव्हा हे सर्किट पूर्ण झाल्यामुळे मनुष्याला शॉक बसतो. वरील लेख आपल्याला आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *