रकुलने खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवली. माध्यमांद्वारे नेहमी चर्चेत असते. कधी योगा तर कधी आरोग्याबाबत जागरूकता तर कधी तिने परिधान केलेल्या कपड्यावर बद्दल चर्चा या माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आज सुद्धा रकुल चर्चेचा विषय ठरलेली आहे परंतु यावेळी कारण हे वेगळे आहे चला तर जाणून घेऊया कोणते कोणते कारण आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा रकुल ही चर्चेत आलेली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्व चाहत्यांना भुळ पाडणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आता बॉलीवूडमध्ये सुद्धा ओळखीचे नावं झाले आहे. तामिळ तेलगु चित्रपटांमध्ये काम करत असताना पूने बॉलीवूड विषयांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर रुजवली आहे. रकुलने या चित्रपटाद्वारे बॉलिवूड विश्वात पदार्पण केले.
चित्रपट ‘दे दे प्यार दे’ मध्ये रकुल प्रीत सुपरस्टार अजय देवगन यांच्या सोबत रोमांस करताना पाहायला मिळाली होती. एका वार्तांकन संस्थेला दिलेल्या मुलाखतीत रकुल प्रीत सिंहला विचारले गेले कि, तुम्हाला तुमचा जीवनसाथी कसा हवाय? त्याच्याबद्दल तुझे काय मत आहे? यावर अभिनेत्रीने उत्तर दिले कि, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो उंच असावा. मी उंच हिलचे बूट घातल्यांनंतर हि त्याच्याकडे पाहताना मला डोके वर करावे लागेल. दुसरे वैशिष्ट्ये असे कि त्याला चांगली बुद्धी असावी. हुशार चातुर्य त्याच्या अंगी असावे आणि शेवटी जगण्यासाठी त्याचे काहीतरी जीवनात ध्येय असले पाहिजे. अभिनेत्रीने पुढे सांगीतले कि, मी विवाह संस्था आणि प्रेम यावर विश्वास ठेवते. मला असे वाटतं की हे खुप सुंदर आहे. मला हे कळत नाही की याला लोक दबावाच्या दृष्टिकोनातून का पाहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा त्याला त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करत असतात आणि मीसुद्धा अशा प्रकारची व्यक्ती आहे.
रकुलच्या कामाबद्दल जर बोलल्यास चित्रपट ‘दे दे प्यार दे ‘मध्ये आपण सर्वांनी पाहिले होते. चित्रपटात रकुल ही अभिनेता अजय देवगन सोबत रोमान्स करताना दिसली होती. चित्रपटात अजय एक विवाहित पुरुष होता, त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री तब्बू ने साकारली होती. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई मिळाली होती आणि हा चित्रपट लोकांच्या चांगलं पसंतीस उतरला होता. रकुलने कन्नड चित्रपट ‘गिलि’ ‘वेंकत्द्री एक्स्प्रेस’, ‘लोकेम’, ‘किक २’, ‘ध्रुव’ यामध्ये अभिनय केला आहे. वरील लेख आपल्याला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.