बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्ये*ला २ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मागील एका महिन्यात या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. सध्या या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा तपास ईडी सोबतच सी बी आय सुद्धा करत आहे. नुकतेच या केसमध्ये सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*च्या दिवशी त्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडणारा चावी वाला समोर आला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या चावीवाल्याने सांगितले की, सुशांतने आ*त्म*ह*त्या केलेल्या दिवशी त्याला सिद्धार्थ पिठाणीने फोन करुन बोलावले होते. सिद्धार्थने चावीवाल्याला फोनवर सांगितले की एक व्यक्ती त्याच्या रूममध्ये झोपला आहे. खूप दरवाजा ठोकून सुद्धा तो उठत नाही.
त्याला फोन सुद्धा लावले तरी तो फोन उचलत नाही आहे त्यामुळे तू जरा लवकर इथे येऊन तो दरवाजा उघडून दे. त्यानंतर चावी वाल्याने त्याच्याकडे त्या ठिकाणाचे लोकेशन मागितले व त्या लॉकचे फोटो व्हाट्सअप वर पाठवायला सांगितले जेणेकरून तो त्या लॉक प्रमाणे त्याचे टूल्स घेऊन सुशांतच्या घरी जाईल. मात्र त्यावेळी सिद्धार्थने बंद असलेल्या सुशांतच्या बेडरूम ऐवजी उघड्या असलेल्या एका खोलीच्या लॉकचा फोटो त्या चावी वाल्याला व्हाट्सअप केला. त्यानंतर चावी वाल्याने खऱ्या बंद असलेल्या बेडरूमच्या लॉक चे फोटो पाठवायला सांगितल्यानंतर मग त्याने खऱ्या दरवाजाच्या लॉक चे फोटो पाठवले. त्यानंतर चावी वाला त्याच्या भावाला घेऊन सुशांत जेथे राहात होता त्या अपार्टमेंटमध्ये गेला. सुशांत चा दरवाजा कम्प्युटराईज चावी वाला असल्यामुळे त्या दरवाज्याची चावी तयार करण्यास साधारण अर्ध्या ते एक तासाचा वेळ लागणार होता. मात्र आतील माणूस खूप वेळ झाला तरी उठत नाही त्यामुळे तू लवकरात लवकर चावी बनवून दे असे सिद्धार्थने चावी वाल्याला सांगितले.
सिद्धार्थने त्या चावीवाल्याला आत मध्ये कोण झोपले आहे हे कळू दिले नव्हते. तो सतत आत मध्ये एक व्यक्ती झोपली आहे नॉक करून किंवा फोन करून सुद्धा ती उठत नसल्यामुळे तू फक्त चावी बनवून दे एवढेच सांगत होता. चावी बनवायला एक तासाचा वेळ लागत असल्यामुळे त्यांनी त्याला दरवाजा तोडण्याचा सांगितले. व तोडताना मध्ये जरा थांबून आतून काही रिस्पॉन्स येतो का हे बघायला सांगितले. तोडण्याचा आवाज ऐकून जर आतून रिस्पॉन्स आला तर दरवाजा तोडू नकोस असे त्या चावी वाल्याला सांगण्यात आले होते.
मात्र तसा कोणताच रिस्पॉन्स आतून आला नाही. तो दरवाजा तोडायला साधारण सात ते आठ मिनिटांचा कालावधी गेला. त्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला व त्या चावील्याने जेव्हा दरवाजावरील हँडलला पकडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सिद्धार्थने त्याला थांबवून त्याचे टूल्स घेऊन त्याला जाण्यास सांगितले. म्हणजेच सिद्धार्थने त्या चावी वाल्याला दरवाजा तोडल्यानंतर तो उघडू दिला नव्हता.
त्यावेळी सिद्धार्थ सोबत अजून काही लोक उपस्थित होते. त्यामुळे त्या चावी वाल्याने दावा केला की मी दरवाजा तोडला मात्र सिद्धार्थने मला तो उघडण्यास मनाई केल्यामुळे मी आतील काहीच बघू शकलो नाही. एवढेच नव्हे तर आत मध्ये त्याला सुशांतची बॉडी होती हेसुद्धा माहीत नव्हते. तो चावी वाला घरी गेल्यानंतर साधारण तासाभराने सिद्धार्थ पिठाणीच्या फोन वरून त्याला पुन्हा फोन आला मात्र त्यावेळी तो फोन पोलिसांनी केला होता व त्याला पुन्हा त्या ठिकाणी बोलावले गेले. चावी वाल्याच्या मते तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या हावभावावरून ती म*र्ड*र नसून एक आ*त्म*ह*त्या*च आहे. तसेच मुंबई पोलीस सुद्धा चांगले काम करत असल्याचे त्यांने सांगितले.