“लहान मुलं म्हणजे देवाघरची फुले” ही म्हण आपण सर्वजण जाणतोच पण सगळ्याच लहान मुलांना देवाच्या नजरेने पाहिले जाते असेच नाही. जगामध्ये असे अनेक लहान मुले आहेत, ज्यांना आई-वडिलांचा सहारा नाही ती अनाथ आहेत. अशा मुलांना समाजातील सगळेच जण स्वीकारतात असे सुद्धा नाही पण काही माणसे असे सुद्धा आहेत की, ते कोणताही रंग ,धर्म ,जात, पंथ न मानता या मुलांवर प्रेम करतात आणि त्यांना आपलेसे करतात. आजच्या या लेखांमध्ये आम्ही अशाच एका आई बद्दल सांगणार आहोत जिने एका मुलीला दत्तक घेऊन तिच्या आयुष्याचं सोनं केलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया या व्यक्तीबद्दल !! त्यावेळी निशा अंदाजे दोन वर्षाची होती. निशाला दत्तक घेऊन तीन वर्ष पूर्ण झाले आहे. याचेच औचित्य साधून सनी लियोनीने मुलीच्या नावे एक भावनिक पत्र लिहिले आहे.
सनी लियोनी ही सध्याच्या दिवसांमध्ये पति डेनियल वेबर आणि तीन मुलांसमवेत अमेरिकेत आहे. सनीने आजच्या ३ वर्षांपूर्वी मुलगी निशाला महाराष्ट्राच्या लातूर शहरांमधून दत्तक घेतले होते. त्यावेळी फक्त २१ महिन्याची होती. निशाला दत्तक घेऊन आता तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत. याचेच औचित्य साधून सनी लियोनी ने मुलीच्या नावाने एक भावनिक पत्र लिहिलेले आहे. सनीने निशा शिवाय पती आणि दोन मुलांचा सोबत एक फोटो शेअर करत निशाला आपल्या कुटुंबात आल्याबद्दल तिचे आभार सुद्धा व्यक्त केले आहे. सनी लियोनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की तीन वर्षांपूर्वी तू आम्हाला आई – वडिलांच्या रूपात आम्हाला निवडले होते. तू आमच्यावर विश्वास दाखवला की आम्ही तुझी उत्तम देखभाल करू शकतो. जशी माझी तुझ्यावर नजर पडली, तेव्हा मी समजून गेले की तूच माझी मुलगी आहेस.
सनी लियोनीने पुढे अजून लिहिले आहे की, जेव्हा मी तुला पाहते तेव्हा मला तुझ्यात एक स्वावलंबी मुलगी नजरेस येते, जे तू पुढे मोठी झाल्यावर स्वतःच्या बळावर उभी राहणार आहेस. मी प्रत्येक वळणावर तुझ्यासोबत असणार आहे. निशा मी तुझ्यावर प्रचंड प्रमाणात प्रेम करते. आमच्या जीवनाची रोशनी आहेस आणि प्रत्येक दिवशी आमच्या आनंदी राहण्याचे एकमेव कारण सुद्धा तूच आहेस. तसेच सनी लियोनीचे पति डेनियल वेबर ने मुलीसाठी एक पोस्ट लिहिले आहे त्यामध्ये लिहिले आहे की , वर्षापूर्वी तू आमच्या जीवनात आली. तू आमच्यासाठी सर्वात विशेष अशी व्यक्ती आहे. १६ जुलै २०१७ ला सनी आणि डॅनियलने लातूर महाराष्ट्रच्या एका अनाथालय मधून निशाला दत्तक घेतले होते. त्यावेळी च्या फक्त २१ महिन्याची होती. एडॉप्शन एजेंसी CARA अनुसार सनी आणि डॅनियल यांच्या आधी ११ जोडप्यांनी निशाला दत्तक घेण्यापासून नकार दिला होता.
खरतर निशाला स्वीकार न करण्याचे कारण म्हणजे तिचा काळा रंग हा होता. मुलांना दत्तक घेणारी संस्था म्हणजेच चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजेंसी (सीएआरए) चे सीईओ, लेफ्टिनेंट कर्नल दीपक कुमार ने या गोष्टीचा खुलासा केला होता. दीपक कुमार यांच्यानुसार खरं तर अधिक तर कुटुंब, मुलांचा रंग, चेहरा त्यांची मेडिकल इतिहास हे सर्व जाणून घेण्यास उत्सुक असतात आणि याच कारणामुळे त्यांना आपलेसे किंवा नाकारले जाते. याच कारणामुळे निशाला आधी ११ कुटुंबीयांनी स्वीकार करण्यापासून नाकारले होते. आपणास सांगू इच्छितो की, निशा शिवाय सनी लियोनीला दोन मुलं आहेत. त्या दोन मुलांची नावे नोह आणि अशेर आहेत. त्यांचा जन्म सरोगेसी द्वारे झाला होता. ४ मार्च, २०१८ ला सनी लियोनी दोन जुळ्या मुलांची आई बनली. पोर्न स्टार ते अभिनेत्री बनलेली सनीलियोनी २०११ साली तिचा प्रियकर डेनियल वेबर सोबत विवाहबद्ध झाली.

सनी लियोनी महिन्यामध्ये आपल्या तिन्ही मुलांच्या समवेत आणि पती डेनियल वेबर च्या सोबत मुंबईतून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे रवाना झाली होती. त्यानुसार या कठीण काळामध्ये अमेरिकामध्ये राहणे ठीक आहे. सनीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सुद्धा सांगितले होते की, त्यांनी हा निर्णय तिच्या मुलांसाठी घेतला. सनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आपण सनीला चित्रपट अर्जुन पटियाला मध्ये पाहिले होते. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कृति सेनन प्रमुख भूमिकेमध्ये होते. येणाऱ्या आगामी काळामध्ये सनी, ‘कोका कोला’ आणि हेलेन नावाच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *