चित्रपट आणि त्या चित्रपटाच्या कथेतील पात्र ही बहुतेकदा कु तू ह ला चा विषय असतो आणि पात्र साकारणारे अभिनेता किंवा अभिनेत्री या सुद्धा चित्रपटाच्या यश आणि अपयश यावर खूप मोठा परिणाम करत असतात. काही चित्रपटातील भूमिकांमुळे अभिनेता व अभिनेत्री यांच्या आयुष्यात सुवर्ण दिवस येतात आणि अभिनेता द्वारे साकारल्या गेलेल्या भूमिकेमुळे ते पात्र सुद्धा अजरामर होऊन जाते. आज आपण अशाच एका पात्राबद्दल या लेखांमध्ये बोलणार आहोत ते म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता चित्रपट बाहुबली आणि त्या चित्रपटातील महत्त्वाचे लोकप्रिय असलेले र ह स्य म य ता निर्माण करणारा पात्र म्हणजे कटप्पा. चला तर जाणून घेऊया या कटप्पाबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी.
बाहुबली या चित्रपटामध्ये कटप्पा हे पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. विशेष बाब म्हणजे या भूमिकेसाठी बॉलीवूड मधील एका सुपरस्टार्सला आधी विचारण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेता प्रभास अभिनयीत चित्रपट बाहुबली खूपच चर्चमध्ये राहिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता तसेच चित्रपट समीक्षकांची सुद्धा भरपूर वाह वाह मिळवली होती. चित्रपटात प्रभास याने साकारलेले महेंद्र बाहुबली सोबतच एक असे पात्र होते. जे पात्र प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झाले होते आणि त्या पात्राचे नाव आहे “कटप्पा”. कटप्पा हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते आणि हे पात्र अश्या काही महत्त्वाच्या भूमिका आहेत ज्या नेहमी लक्षात राहतात त्यातील असे एक पात्र म्हणून कटप्पाकडे भविष्यात पाहिले गेले. कटप्पाच्या संदर्भात एक प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता तो म्हणजे “कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा?”
हे पात्र फक्त प्रसिद्धच झाले नाही तर पात्र स्विकारणारे अभिनेता याचे सुद्धा खूप कौतुक करण्यात आले परंतु आपणास एक गोष्ट माहिती आहे का? हे पात्र बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते याच्या वाट्याला येणार होते. जर सोशल मीडियाची प्रतिक्रिया पाहिली तर आपल्याला एक गोष्ट कळून येते की, या पात्रासाठी तो अभिनेता अतिशय योग्य होता. खरंतर कटप्पा हे पात्र संजय दत्तला साकारण्यासाठी विचारण्यात आले होते परंतु हे काही पुढे शक्य झाले नाही. त्यानंतर अभिनेता सत्यराजने कटप्पाची भूमिका साकारली आणि या भूमिकेला प्रेक्षकांद्वारे मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. असे सांगितले जाते की जेव्हा कटप्पा या भूमिकेसाठी संपर्क साधला असता तेव्हा संजय दत्त हा जे ल म ध्ये त्याची शिक्षा भोगत होता. या कारणामुळे त्याने हे पात्र सोडून दिले परंतु जर संजय दत्त कटप्पाची भूमिका साकारली असती तर कसे वाटले असते. असे तर संजय दत्त ने आत्तापर्यंत अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत आणि त्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या सुद्धा आहेत आणि जर संजय दत्तने ही भूमिका साकारली असती तर ती सुद्धा लोकप्रिय झाली असती यात कोणत्याच प्रकारची शंका नाही.
त्याच्याआधी संजयने अग्निपथ मध्ये कांचा ची भूमिका साकारली होती, ज्याला प्रचंड प्रमाणात पसंती मिळाली होती. तेच पानिपत या चित्रपटांमध्ये अहमद शाह अबदालीची भूमिका संजयने साकारली होती. ज्यामध्ये संजय खलनायकच्या रूपामध्ये खूपच साजेसा होता. या भूमिकेला प्रेक्षकांद्वारे भरभरून प्रेम देण्यात आले आणि असे सांगीतले जाते की, शिवगामी पात्राची भूमिकेसाठी आधी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला याबाबत विचारणा केली होती. तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये संजय दत्त दक्षिणेच्या अजून एका चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *