बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*ला दोन महिने उलटून गेल्यावर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सी बी आय चौकशीची मागणी मान्य झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सी बी आय ची टीम आज सकाळी वांद्रे पोलीस स्टेशन वर दाखल झाली आहे. वांद्रे पोलीस स्टेशन मधून सी बी आय’ने डी सी पी अभिषेक त्रिमुखे यांना भेटली. सध्या एक पोलीस अधिकारी सुशांतच्या कुकची जबानी घेत आहेत. त्याच सोबत सुशांत चा मित्र संदीप सिंह याची सुद्धा सी बी आय चौकशी करेल अशी माहिती मिळाली आहे. सुशांत सिंह राजपूत ची डायरीज, मोबाईल आणि लॅपटॉप स्वतःच्या ताब्यात घेतला. याआधी ही टीम एका अज्ञात व्यक्तीला सोबत घेऊन चौकशीसाठी आली होती. मात्र ही व्यक्ती कोण याची ओळख अजून पटलेली नाही. सुशांत च्या मृत्यूनंतर अभिषेक त्रिमुखे आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती मध्ये अनेकदा फोनवर बोलणे झाले होते. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत या आ*त्म*ह*त्या प्रकरणी ५० हून अधिक लोकांची जबानी नोंदविण्यात आली आहे.
या आ*त्म*ह*त्या प्रकरणी सी बी आय ने एका अज्ञात व्यक्तीला चौकशीसाठी पाली हिल वरून एअरफोर्सच्या गेस्टहाऊसवर घेऊन गेले. दिल्लीहून आलेली सी बी आय ची टीम सध्या एअरफोर्सच्या गेस्ट हाउस मध्ये वास्तव्यास आहे. सी बी आयच्या टीमने सुशांतचा कुक निरज सोबत सुद्धा संपर्क साधला होता. काही दिवसांमध्ये त्याची सुद्धा जबानी नोंदविण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन दिवसात क्रा ई म स्पॉटवर सी बी आय तपास करण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळ पर्यंत एक टिम सुशांतच्या घरी जाऊन तपास करू शकते. तसेच पुढील काही दिवसांमध्ये सी बी आय ची टीम फॉ रे न्सि क एक्सपोर्ट सोबत ऑ टो प्सी रिपोर्ट, क्रा ई म सीन, फोटोग्राफ, व्हिडिओ या सर्व गोष्टींचा तपास करणार आहे.
क्रा ई म सीन पाहिल्यानंतर सी बी आय ची टीम पुन्हा एकदा दिल्लीला जाऊन सी एफ एस एल मध्ये सॅम्पल्स चा तपास करेल. सुशांतच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज सी बी आय ने ताब्यात घेतले असून सुशांत आ*त्म*ह*त्या केलेल्या दिवशी सीसीटीव्ही योग्यरीत्या काम करत होता की नाही. जर करत नसेल तर त्या सोबत कोणी छे ड छा ड केली आहे का हे सर्व तपासणार आहे. ज्या कंपनीने तो सीसीटीव्ही लावला होता त्यांचीसुद्धा चौकशी होणार आहे. सोबतच सी बी आय सुशांतचा खास मित्र महेश शेट्टीची सुद्धा जबानी नोंदवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *