बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सनी देओल सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सनी देओल ने राजकारणाच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीने त्याला गुरुदासपूर मधून लोकसभेचे तिकीट दिले. सनी देओल च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने त्याचे वैयक्तिक आयुष्य लाईम लाईट पासून नेहमीच दूर ठेवले. त्याने लग्न सुद्धा गपचूप विदेशात जाऊन केले होते. त्यानंतर कित्येक वर्ष त्याने त्याचे लग्न झाल्याचे सगळ्यांपासून लपवून ठेवले. सनी देओल च्या पत्नीचे नाव पूजा असून तिला लाईम लाईट मध्ये येणे आवडत नाही. आज आम्ही सनी देओल ने त्याच्या लग्नाबाबत र ह स्य का निर्माण केले यावरून पडदा उठवणार आहोत.
तुम्हाला ठाऊक असेल की सनी देओलने त्याच्या करिअरची सुरुवात बेताब चित्रपटापासून केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रमुख अभिनेत्री म्हणून अमृता सिंह ने काम केले होते. अभिनेत्री अमृता सिंह आणि सनी देओल या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि तो चित्रपट सुपरहिट झाला होता. दरम्यान अभिनेत्री अमृता सिंह सनी देओल च्या प्रेमात पडले आणि त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. अमृता, सनी देओल च्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला त्यांच्या नात्याबद्दल संपूर्ण जगाला सांगायचे होते. मात्र सनी देओल वर त्याच्या परिवाराची जबाबदारी असल्याने त्याने ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवण्यास सांगितले. अमृताचे लग्न एका मोठ्या परिवारात व्हावे अशी अमृताच्या आईची इच्छा होती.
त्यामुळे अमृताने सनी देओल च्या परिवाराबद्दल माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला समजले कि सनी कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहे. त्यावेळी सनी देओलचे लंडन मध्ये राहणाऱ्या पूजा नावाच्या मुली सोबत अफेअर होते. हळूहळू अमृताला हे देखील समजले की सनी व पूजाचे लंडनला लग्न झालेले आहे. ही बातमी समजल्यानंतर अमृता सिंह पूर्णपणे खचून गेली होती. सनीचे करियर त्यावेळी नुकतेच सुरु झाल्यामुळे त्याने त्याच्या लग्नाबाबत ची खबर सर्वांपासून लपवून ठेवली होती. त्याला असे वाटायचे की त्याच्या लग्नाची बातमी समजल्यावर त्याचे फॅन्स त्याला एक रोमँटिक हिरो म्हणून मानणार नाहीत.