बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*ला दोन महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. मात्र याबाबत अजूनही ठोस कारण सापडत नाही. याउलट हे प्रकरण आणखीनच चिघळत चालल्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय’ कडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. अशातच सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणात नुकतेच त्याच्या बँक डीटेल्स आणि कॉल डिटेल्स संबंधी खुलासा झाला. आतापर्यंत याबाबत कोणालाच कुठलीही माहिती नव्हती. मात्र अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या समोर आलेल्या कॉल डिटेल्स वरून अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत जेणेकरून तिच्यावर प्रश्न उठवले जात आहेत. मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती ८ जून ला सुशांतचे घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर १४ जूनला सुशांतने त्याच्या राहत्या घरी आ*त्म*ह*त्या केली. यादरम्यान रिया चक्रवर्तीने निर्माता-दिग्दर्शक महेश भट सोबत खूप वेळा फोनवर बोलणे केले.
मिळालेल्या बातमीनुसार १४ जून ला सुशांतने आ*त्म*ह*त्या केलेल्या दिवशी रिया चक्रवर्ती कुठल्यातरी एका महिलेसोबत एक तासाहून अधिक काळ फोनवर बोलत होती. त्यादिवशी रिया च्या फोनवर ७ कॉल्स आणि २५ मेसेजेस आले होते. तर रियाने स्वतःहून ९ कॉल्स केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतने आ*त्म*ह*त्या केलेल्या दिवशी सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी राधिका मेहता नावाच्या महिलेने रिया ला कॉल केला होता. त्यावेळी या दोघींमध्ये ३० मिनिट ५५ सेकंदांचे मोठे संभाषण झाले. त्यानंतर ८ वाजून ८ सेकंदांनी रियाने राधिका ला कॉल केला. त्यानंतर तीस मिनिटे त्यांच्यात संभाषण झाले. पुन्हा एकदा तिसऱ्या वेळा रियाने राधिकाला ८ वाजून ३८ मिनिटांनी कॉल केला त्यावेळी त्यांच्यात ५ मिनिटे ४१ सेकंद बोलणे झाले.
कॉल डिटेल्स वरून दिसले की, रिया व सुशांतचे ५ जून ला शेवटचे बोलणे झाले होते. मात्र तसे बघायला गेले तर ५ जूनला रिया सुशांतच्या घरीच होती. ५ जून ला सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी सुशांतने रियाला फोन केला होता. त्यावेळी त्या दोघांचे २ मिनिट फोनवर संभाषण झाले. त्यानंतर १० वाजायच्या आसपास रियाने सुशांत ला फोन केला होता. तो फोन केवळ तीन सेकंदांसाठी होता. हे त्यांचे फोनवरील शेवटचे संभाषण होते.