बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप कमी वेळात स्वतःचे खूप नाव कमावले आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे पक्के स्थान निर्माण केले. मात्र या प्रसिद्ध कलाकारांपैकी काही कलाकार आता आपल्यात राहिले नाहीत. मात्र त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी मोठ्या पडद्यावर सलमान खानची आई म्हणून प्रसिद्ध झाली होती. ही अभिनेत्री म्हणजे छोट्या व मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री रीमा लागू आहे. आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की काही वर्षांपूर्वी अभिनेत्री रीमा लागू यांना देवाज्ञा झाली. परंतु त्यांच्या प्रतीचे प्रेम प्रेक्षकांच्या मनात अजूनही कमी झालेले नाही. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे वयाच्या ५९ व्या वर्षी रीमा लागू यांचा मृत्यू झाला. फक्त चित्रपटातच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा रीमा लागू यांची प्रतिमा एखाद्या मॉर्डन आईप्रमाणेच होती. रीमा लागू यांनी आज पर्यंत स्वतःच्या दमावर सर्वकाही मिळवले होते.
त्यांनी जे काही मिळवले ते स्वतःच्या बळावर अथक संघर्ष करून मिळवले होते. बालपणापासूनच रीमा लागू यांना अभिनयात रुची होती. त्यामुळेच त्यांनी लहानपणी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले व बालकलाकार म्हणून ९ चित्रपट केले.
एका मराठी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार रीमा लागू यांच्यावर अभिनयाचा असर इतका होता की हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होतात त्यांनी लगेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी बद्दल. मृण्मयी सुद्धा एक अभिनेत्री आहे. तसे पाहायला गेले तर मृण्मयी टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये एवढी ॲक्टिव नाही. तिला अधिक तर मराठी चित्रपटांमध्ये पाहिले गेले. विशेष म्हणजे मृण्मयीने थ्री इडीयट्स या चित्रपटामध्ये अमीर खानला असिस्ट केले होते.
मृण्मयीला तिच्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये एक चांगली अभिनेत्री होण्याची इच्छा होती. मध्यंतरी ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा बातम्या सुद्धा येत होत्या. मात्र बॉलिवूडमध्ये भलेही ती जास्त एक्टिव नसली तरीही मराठी चित्रपटांमध्ये ती अनेकदा दिसते. मृण्मयीने बॉलीवूड मध्ये थ्री इडीयट्स, दंगल, आणि पीके यां सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. दोघात तिसरा आता सगळं विसरा ह्या मराठी चित्रपटामध्ये देखील भूमिका केली आहे.
तिच्या आईची आवड ओळखून मृण्मयी सुद्धा आता टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. मृण्मयीच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाल्यास ती कुठल्या ही बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा कमी नाही. मृण्मयी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते व काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *