बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांच्या रिलेशनशिपचा खूप गोलमाल पाहायला मिळतो. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे सर्वसामान्य लोकांसाठी खूप असामान्य गोष्ट असते. मात्र बॉलीवूड दुनियेतील कलाकार अगदी सहज एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये रहातात‌. चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम करता करता हे कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग एकमेकांचा सहवास अधिक काळ मिळावा यासाठी लिव्ह इन रिलेशन शिपचा पर्याय अवलंबतात.

बॉलिवूडमध्ये सध्या काही जोड्या लग्न होण्या आधी एकमेकांसोबत राहू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाचा चर्चा जोरदार होताना दिसत आहे. एका प्रसिद्ध फोटोग्राफर सोबत श्रद्धा विवाह बंधनात अडकणार आहे असे म्हटले जाते. तिच्या लग्नाचे माहीत नाही पण ती एका अभिनेत्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. याआधी श्रद्धा कपूर चे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले होते.

काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरचे अभिनेता फरहान अख्तर सोबत नाव जोडले गेले होते. या दोघांनी रॉक ऑन‌ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटा दरम्यान या दोघांमधील जवळीक वाढत गेली. श्रद्धा फरहानच्या इतकी प्रेमात बुडाली होती की ती त्याच्या घरी राहण्यास गेली. त्यावेळी श्रद्धा तिचे जुहू चे घर सोडून दोन मुलांचे वडील असलेल्या फरहान सोबत लिव्ह इन मध्ये राहण्यास गेली होती. या सर्व प्रकाराबाबत श्रद्धाच्या घरच्यांना काहीच माहीत नव्हते. नंतर जेव्हा श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांना हा सर्व प्रकार कळला त्या वेळी त्यांनी लगेच श्रद्धाला जबरदस्ती घरी आणले.

त्यावेळी मिडियामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे या बातम्यांना हैराण होऊन शक्ती कपूर फरहान च्या घरी श्रद्धाला घ्यायला पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शिवानी कोल्हापुरी सुद्धा होती. त्यावेळी मीडियाच्या अनेक कॅमेरामध्ये ते कैद झाले होते. त्यावेळी फरान अख्तर च्या घरातून श्रद्धा कपूर चे सामान बाहेर घेऊन जाताना शक्ती कपूर यांना पाहिले गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *