बॉलीवूड मधील दुनिया एकदम वेगळी आहे. इथे कोण शेवटपर्यंत टिकून राहील तर कोण कोणाच्या नजरेतून उतरेल हे काही सांगता येत नाही. बॉलीवूड मधील काही कलाकार आजही खूप स्ट्रगल करताना दिसतात. तर काही कलाकार असेही आहेत जे हिट चित्रपट देऊनही सध्या गायब आहेत. अशीच बॉलीवूड मध्ये एकेकाळी हिट चित्रपट देणारी अभिनेत्री ग्रेसी सिंह सध्या बॉलीवूड मधून नाहीशी झाली आहे. ग्रेसीने सुरुवातीच्या काळात बॉलीवूड मध्ये एकदम धमाकेदार एंट्री केली होती. पण अचानक ती बॉलिवूड पासून दूर गेली व हळूहळू तिचे करिअर बी- ग्रेड चित्रपट आणि टीव्ही मालिकां वर येऊन थांबले. सध्या ती लाईम लाईट पासून खूप दूर गेली आहे. आज आम्ही तुम्हाला ही प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री ग्रेसी अचानक लाईम लाईट पासून दूर काय झाली आणि आता ती काय करते हे सांगणार आहोत.
अभिनेत्री ग्रेसी सिंह चा जन्म २० जुलै १९८० मध्ये दिल्ली येथे झाला. लहानपणी ग्रेसी अभ्यासात हुशार असल्यामुळे तिने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे अशी तिची आई वडिलांची इच्छा होती. मात्र ग्रेसी बॉलिवूडची स्वप्न पाहत असल्यामुळे तिने शिक्षणानंतर मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले. १९९७ मध्ये ग्रेसी सिंहला अमानत या टीव्ही शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अमानत या मालिकेमुळे ग्रेसीला स्वतःची ओळख निर्माण करता आली होती. मात्र अजूनही तिला अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करून नशीब आजमवायचे ठरवले.२००१ मध्ये ग्रेसीचे नशीब अचानक चमकले. त्यावर्षी ग्रेसीला मोठ्या पडद्यावरील सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो म्हणजे ग्रेसी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सोबत सुपर डुपर हिट लगान या चित्रपटामध्ये दिसली होती.
त्याकाळी लगान चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना साधी सरळ अशी गावची मुलगी हवी होती. ज्यावेळी त्यांनी ग्रेसीला पाहिले त्यावेळी त्यांचा त्या मुलीचा शोध पूर्ण झाला व ग्रेसी रातोरात स्टार बनली. त्यावेळी लगान चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी विदेशी चित्रपटांत बरोबर नामांकन मिळाले होते. त्याकाळी सगळीकडे ग्रेसीच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर ती २००३ मध्ये अभिनेता अजय देवगन सोबत गंगाजल या चित्रपटामध्ये दिसली. हासुद्धा चित्रपट त्या वेळी बॉक्स ऑफिसवर खूप चालला. त्यामुळे तिच्या करिअरला चार चांद लागले होते. त्यानंतर तिने संजय दत्तसोबत मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटांमध्ये काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. या चित्रपटासाठी ग्रेसीला अनेक अवॉर्ड सुद्धा मिळाले.
ग्रेसीचे अनेक चित्रपट हिट होऊन सुद्धा ती लवकरच चित्रपटांमधून गायब झाली. ग्रेसी सुंदर आणि टॅलेंटेड असून सुद्धा तिचे एक/दोन चित्रपट झाल्यामुळे तिला हळूहळू काम मिळणे बंद झाले. त्यातच त्यावेळी राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय, प्रीती झिंटा यांसारख्या सुंदर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टॉपच्या पोझिशनला येत होत्या. ग्रेसीचे चित्रपटांपासून दूर होण्यामागील अजून एक कारण म्हणजे ऐश्वर्या, राणी, प्रीती या अभिनेत्री ग्लॅमरस भूमिका साकारायचा तशा भूमिका ग्रेसीने कधीच केल्या नव्हत्या. त्यामुळे तिचे चित्रपट होऊ लागले व तिला काम मिळणे बंद झाले.
एकेकाळी मोठ्या चित्रपटांमध्ये काम करणारी ग्रेसी अचानक चित्रपट मिळणे बंद झाल्यामुळे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करू लागली. २००८ मध्ये तिने कमाल आर खान यांच्या देशद्रोही या चित्रपटांमध्ये काम केले होते परंतु तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही त्यामुळे तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. जय संतोषी मा या मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली. सुंदर आणि टॅलेंटेड असून देखील ग्रेसीचा बॉलिवूडमध्ये फारसा टिकाव लागू शकला नाही यामागे नेपोटीज्म हे सुद्धा कारण आहे असे म्हटले जाऊ लागले. ग्रेसीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की मी मेहनत करू शकते पण चापलूसी नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालणारे राजकारण मला समजत नाही. चित्रपटांमध्ये रोल मिळवण्यासाठी दिग्दर्शकांकडे जाणे, पार्ट्या अटेंड करणे या सर्व गोष्टी मला समजत नाहीत. माझ्या अशा सवयीमुळे मला काम मिळणे कधी बंद झाले हे मला कळलेच नाही.
ग्रेसीला बॉलिवूडमध्ये करिअर बनवायचे होते पण तीचा थोडासा कल अध्यात्मा कडे सुद्धा होता. बॉलीवूडमध्ये मिळू लागल्यानंतर ती ब्रह्मकुमारीशी जोडली गेली. शिवाय ती एक भरतनाट्यम नृत्यांगना सुद्धा आहे. ग्रेसी दरवर्षी ब्रह्मकुमारी ला जाते. तेथे होणाऱ्या अध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेते. तसेच अनेक वेळा तिथे होणाऱ्या समारंभांमध्ये भरतनाट्यम सुद्धा करते. त्यामुळे सध्या ग्रेसी पूर्णपणे अध्यात्माकडे वळली असून बॉलीवुड पासून दूर झाली आहे असे म्हटल्यास हरकत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !