बुधवारी सुशांत सिंह राजपूतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणीने सी बी आयच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला. सिद्धार्थने सी बी आयला सांगितले की, सुशांत घर सोडण्यापूर्वी रियाने आयटी प्रोफेशनलला घरी बोलावून त्याच्याकडून आठ कॉम्प्युटर हार्ड डिस्क नष्ट करून घेतले होते. हे सर्व सुशांतच्या सहमतीने झाले होते असे सांगितले. त्यानंतर रिया तिचा भाऊ शोविक सोबत सुशांतचे घर सोडून निघून गेली. ही सर्व घटना ८ जुनला घडली होती. सिद्धार्थ पिठाणीच्या या खुलाशा नंतर सुशांत सिंह राजपूत च्या परिवाराचे वकील विकास सिंह यांचे निवेदन आले आहे.
न्यूज एजन्सी एएनआय सोबत बोलताना विकास सिंह यांनी सांगितले की, जर रिया काही दिवसांसाठीच घर सोडून जात होती तर तिला हार्डडिस्क सोबत घेऊन जाण्याची गरजच नव्हती. यावरून सहज स्पष्ट होते की ती सुशांतचे घर कायमचे सोडून जात होती व पुढे सुशांत सोबत काहीतरी अघटित होणार आहे याचा अंदाज तिला आधीच आला होता. आणि सुशांत गेल्यानंतर ही हार्डडिस्क तिच्यासाठी धोका ठरू शकते हे तिला ठाऊक होते.
विकास सिंह पुढे म्हणाले की, त्या हार्ड डिस्कमध्ये असे काहीतरी होते जेणेकरून रियाचा त्या षडयंत्रातील सहभाग स्पष्ट होणार होता. त्यामुळे ती हार्ड डिस्क ड्र*ग्स संबंधित होती ही अजून कशाशी हे पुढे होणाऱ्या तपासातून समजेल. बुधवारी रियाने डिलिट केलेल्या मेसेजला पुन्हा रिट्रिव केले गेले. तिच्या या मेसेज वरुन स्पष्ट होते की सुशांत सुद्धा ड्र*ग्स घेत होता. रिपोर्टनुसार रिया व सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी यांच्यात १९ जानेवारी २०२० ला संभाषण झाले होते.
या मेसेज मध्ये रियाने लिहिले होते की, आज सकाळी तो खूप रडत होता. त्याने सिद्धला सुद्धा घरी परत जाण्यास सांगितले. तो मदत मागत असून त्याला इलाजाची गरज आहे. जर त्याने केले असेल तर चल त्याच्यासाठी डॉक्टरांकडून योग्य ती औषधे घेऊन येऊयात. त्याला तुम्ही खूप आवडता. तुम्ही सर्व त्याची इतकी काळजी घेऊन त्याच्यावर योग्य ते औषधोपचार करूनही तो बरा होत नाही. त्याला वीड पूर्णपणे बंद करावी लागेल.
त्याने मला सांगितले की उद्यापासून हे सर्व सोडून दिले आता झोपायला गेला आहे. उद्या मी पूर्ण दिवस नसेल. उद्या सकाळी ११ वाजता साहिल आरोग्यनिधी मध्ये जाणार आहे ना. यावर श्रुती मोदी ने हा असे उत्तर दिले. अजून एक चॅट मिळाली. ही चॅट रिया चक्रवर्ती व जया साहा यांच्यातील होती. ही चॅट २५ नोव्हेंबर २०१९ मध्ये केली होती. यामध्ये जया रियाला सांगते की, चहा किंवा कॉफी मध्ये चार थेंब टाकून पिण्यास दे. याचा असर तुला ३०/४० मिनिटांनी दिसेल.
दुसरी चॅट ही सॅम्युअल मिरांडा आणि रिया यांच्यातील असून ज्यामध्ये सॅम्युएल म्हणतो, ‘हाय रिया, सामग्री संपली आहे.’ हे संभाषण १७ एप्रिल २०२०चे आहे. यानंतर तो तिला विचारतो की ते आपण शौविकच्या मित्रा कडून घेऊ शकतो का. परंतु त्यांच्याकडे फक्त हॅश आणि बड आहे. हॅश आणि बड कमी स्ट्रॉंग ड्रग्स मानले जातात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !