दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*चा तपास आता सीबीआय करत आहे. सुशांत सिंह राजपूत च्या आ*त्म*ह*त्या*प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती वर अनेक गंभीर आरोप लागले आहेत. ई डी, सी बी आय नंतर आता ना र को टि क्स ब्यूरोने पण रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या केस मध्ये पूर्णपणे फसत चालल्याची जाणीव होत आहे. नुकतेच रियाने अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पोलिसांची मदत मागितली आहे. रियाचा हा व्हिडीओ तिच्या घराबाहेरील असून तेथे अनेक मिडीयावाले समोर उभे आहे.
व्हिडिओ शेअर करत रियाने खाली लिहिलेले, हा माझ्या बिल्डींग मधील कंपाऊंडच्या आतील व्हिडीओ आहे. व्हिडिओ मध्ये दिसत असलेली व्यक्ती माझे वडील इंद्रजीत चक्रवर्ती आहेत. आम्हाला घराबाहेर पडून ई डी, सी बी आय आणि अन्य एजन्सीला तपासात सहकार्य करायचे आहे. मात्र मला व माझ्या परिवाराला सतत ध म क्या मिळत आहे. याप्रकरणी आम्ही लोकल पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांना जाऊन भेटलो. मात्र त्यांच्याकडून कोणतीही मदत आलेली नाही.
https://www.instagram.com/p/CEYg61Nnwoe/
आम्ही तपास करणाऱ्या सर्व एजन्सींना सुद्धा याबाबत माहिती दिली आहेत मात्र त्यांच्याकडून सुद्धा कोणतीही मदत आलेली नाही. अशाने आमचा परिवार कसा जीवंत राहील. आम्हाला या तपासात सर्व एजन्सींना सहकार्य करायचे आहे यासाठीच आम्ही मदत मागत आहोत. मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सुरक्षा द्यावी जेणेकरून आम्ही या तपासात सर्व एजन्सींना सहयोग करू शकू. कोविड च्या काळात लोकांचे सर्व नियम पाळले पाहिजे.
सी बी आय ची टीम या प्रकरणात वेगाने तपास करत आहे. बुधवारी सी बी आयने केलेल्या चौकशीत सिद्धार्थ पिठाणीने कबूल केले की रियाने भांडण करून घर सोडले होते. सोबतच तिने सुशांत असताना आयटी प्रोफेशनल ला बोलावून आठ कम्प्युटर हार्ड डिस्क नष्ट केल्या होत्या. या व्यतिरिक्त रियाचे काही चॅट्स समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रिया ड्र*ग डीलिंग मध्ये पण सहभागी होती. टाईम नाऊ चैनलकडे सुशांतचा स्टाफ सैमुअल मिरांडा, दीपेश सावंत सोबत झाले रियाचे काही चॅट्स आहे. या चॅट्स वरून असे लक्षात येते की रिया ने सैमुअल, दीपेश टैलेंट मैनेजर जया शाहसोबत ड्र*ग्ससंबंधी अनेक गोष्टी बोलल्या होत्या.