विनोदी दुनियेत किकू शारदा या अभिनेत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. किकु चा जन्म १४ फेब्रुवारी १९७५ मध्ये एका मारवाडी कुटुंबात झाला होता. किकूचे खरे नाव रघुवेंद्र असे आहे. बाकी मारवाड्यांप्रमाणे किकूने सुद्धा त्यांच्या परिवाराचा बिजनेस सांभाळावा अशी किकूच्या वडिलांची इच्छा होती. किकुची अभिनय करण्याची इच्छा त्याच्या वडिलांना मान्य नव्हती. अभिनयात किकूचे काही भविष्य नाही असे त्याच्या वडिलांना सतत वाटत राहायचे. मात्र किकूने त्याच्या मेहनत आणि जिद्दीने त्याच्या वडिलांना चुकीचे सिद्ध केले. सध्याचे किकूचे यश पाहता त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांच्या मुलावर गर्व होत आहे.
किकूचा जन्म राजस्थानातील जोधपूर मध्ये जरी झाला असला तरी तो लहानाचा मोठा मुंबईत झाला. कॉलेजच्या दिवसात किकूने थिएटर ग्रुप जॉईन केला. तिथे त्याला एक प्ले करण्याचे ७०० रुपये मिळायचे. अभिनयाव्यतिरिक्त किकूला डान्स करायला खूप आवडायचे. किकून एका मुलाखतीत सांगितले की त्याच्या शाळेजवळ एक लग्नाचा हॉल होता त्यावेळी तो कित्येकदा अज्ञात वरातीत नाचायला घुसायचा. किकूने २००३ मध्ये प्रियंका शारदा सोबत अरेंज मॅरेज केले होते. आता या दांपत्याला आर्यन आणि शौर्य ही दोन मुले आहेत. किकु त्याच्या मुलांसोबत खेळताना स्वतः सुद्धा एक लहान मुलगा बनून जातो. कितींदा त्याला इतर माणसांनी सांगावे लागते की तू आता मोठा झाला आहेस जरा मोठ्यानं सारखा वाग. २०१३ मध्ये तो नच बलिये’च्या सिझन मध्ये सुद्धा दिसला होता. या रियालिटी शोमध्ये त्याची पार्टनर त्याची पत्नी प्रियांका शारदाच होती. त्यावेळी प्रियांका पहिल्यांदाच कॅमेरा समोर आली. आधी हा शो करण्यास तिने नकार दिला होता परंतु किकुची डान्सबद्दलची जिद्द पाहता ती हा शो करण्यास तयार झाली.
किकूने २००३ मध्ये हातिम या मालिकेद्वारे टेलिव्हिजन दुनियेत पाऊल ठेवले होते. त्यानंतर २००६ मध्ये एफ आय आर या मालिकेत त्याने हवालदाराची भूमिका केली होती. या मालिकेत त्याच्या कामाची खूप प्रशंसा केली गेली. मात्र खरी लोकप्रियता त्याला २०१३ मध्ये आलेल्या कपिल शर्माच्या शो ने मिळवून दिली. या शोमध्ये किकूने बच्चा यादव, अच्छा यादव पासून ते लच्छा, पंखुडी, संतोष, बंपर आणि पलक यांसारखे पात्र साकारले आहेत. या शोने किकूला रातोरात प्रसिद्ध केले. आता तो प्रत्येक घरातील एक ओळखीचा चेहरा झाला आहे. तो एखाद्या पात्रात इतका मिसळून जातो की कित्येकदा स्क्रिप्ट मध्ये लिहिले असेल त्यापेक्षा जास्त त्याच्या मनाने तो बोलतो. कित्येकदा त्याने स्वतः केलेली कॉमेडी सुद्धा खूप हिट होऊन जाते. टीव्ही मालिकां व्यतिरिक्त किकूने‌ धमाल, फिर हेरा फेरी, हॅपी न्यू इयर, अंग्रेजी मीडियम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकदा गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री करणे किकूला खूप भारी पडले होते. या प्रकरणामुळे तो १४ दिवस जेलमध्ये होता.
एकेकाळी ७०० रुपये एका प्ले मध्ये घेणारा किकू सध्या वर्तमानात एका एपिसोड साठी ५ ते ७ लाख रुपये फि घेतो. द कपिल शर्मा शो बद्दल बोलायचे झाल्यास या शोचे किकूने आतापर्यंत २५० हून‌ अधिक भाग केले आहेत. यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता की त्याने आतापर्यंत किती कमाई केली असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *