दोन वर्षांपूर्वी बॉलिवुडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता ने मी टू हे आंदोलन छेडले होते. बॉलीवूड मध्ये काम देण्यासाठी स्त्रियांवर होणाऱ्या अ त्या चा रा विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्रींनी स्वतःवर झालेले अ न्या य जगासमोर आणत या आंदोलनात सहभाग घेतला. हे प्रकरण मावळले असे वाटत असतानाच मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्रीने सुद्धा आता या आंदोलनात पाऊल ठेवले आहे. झी मराठीवर काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेली मालिका राधा ही बावरी फेम अभिनेत्री श्रुती मराठे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
श्रुतीने मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये वेडिंग एनिवर्सरी आणि बुधिया सिंह: बॉर्न टू रन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. काही दिवसांपूर्वीच श्रुतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर कास्टिंग काऊच विरोधात एक भली मोठी पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत असून श्रुतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलीवूड मधील मी टू आंदोलन छेडल्यानंतर बॉलीवूड मध्ये होणाऱ्या हरॅसमेंट आणि कास्टिंग काउच संबंधी अनेक केसेस समोर आल्या होत्या. नुकतीच श्रुतीने तिच्याबाबत घडलेली एक घटना जगासमोर आणत पुन्हा एकदा इंडस्ट्रीचा काळा चेहरा जगासमोर आणला आहे.
श्रुतीने ह्यूमन ऑफ बॉम्बे नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम पेज वर एका ऑडिशनच्या वेळी दिग्दर्शका द्वारे तिच्यासोबत घडलेली एक घटना सर्वांसमोर मांडली.

मात्र यावेळी तिने ती कुठल्या चित्रपटाची ऑडिशन देट होती व त्या दिग्दर्शकाच्या नावाबाबत कटाक्षाने गुप्तता पाळली. श्रुती म्हणाली की ऑडिशनची सुरुवात ही अगदी सर्वसाधारण पद्धतीने झाली होती मात्र नंतर हळूहळू तिला विचित्र प्रश्न विचारले. त्यावेळी तिला समझोता व वन नाईट स्टॅन्ड या शब्दांचा वापर करून दाबण्यात आले. मात्र समोरील व्यक्तीच्या उद्देश काय आहे याची चाहुल श्रुतीला लगेच लागली. त्यामुळे त्या दिग्दर्शकाला त्याच्याच पद्धतीने उत्तर देण्याचे ठरवले व ती म्हणाली मी तुमच्यासोबत झोपावे अशी जर तुमची इच्छा असेल तर मला एक सांगा या चित्रपटाच्या नायकाला तुम्ही कोणा सोबत झोपायला सांगणार आहात? अश्रू तिचे हे सडेतोड उत्तर ऐकून त्या दिग्दर्शकाच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. हे वाचून आपल्यालाही तिचा अभिमान वाटेला असेल, पण हे थांबायला पाहिजे, श्रुती सारखे सर्वजण पुढे येऊन व्यक्त होणार नाहीत.

https://www.instagram.com/p/Bv1WfSDncxY/

त्यानंतर स्वतः घेतलेल्या अनुभवावरून इतर अभिनेत्रींना सल्ला देण्यासाठी श्रुती म्हणाली तुम्हाला असे अनेक प्रोजेक्ट मिळतील पण ते वेळीच सोडून टाका. कारण दर वेळी आपण अशा गोष्टींना वाच्यता न फोडता आपलेच नुकसान करून घेतो. माझ्या मते जर कधी एखाद्या महिलेच्या बाबतीत चुकीचे घडत असेल किंवा तिच्या सोबत काही तरी चुकीचे घडवून आणण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा त्या महिलेने समोरील व्यक्तीस योग्य ते प्रतिउत्तर दिले पाहिजे. जेणेकरून ती व्यक्ती पुढे इतर मुलींसोबत अशी हरकत करणार नाही. जर महिलेने काही न बोलता ते अ त्या चा र सहन केल्यास समोरील व्यक्तीची हिम्मत अजून वाढेल. त्यामुळे कास्टिंग काउच किंवा अ त्या चा रा ला सामोर्‍या गेलेल्या महिलेने कधीच मी टू यासारख्या आंदोलनाची वाट पाहत बसू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *