बॉलीवूड चित्रपट सृष्टी जशी वरचेवर चांगली वाटत असली तरी आतून मात्र या चित्रपट सृष्टीत अनेक घटना कळत-नकळत घडत असतात. या चमचमणाऱ्या झगमगाट असणाऱ्या चित्रपटसृष्टीत अनेकजण अनेक कारणांना बळी पडत असतात.असेच एक कारण आहे जे आम्ही आजच्या या लेखात आपल्याला सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याविषयी. अनेकदा असे पाहिले गेले आहे कि, छोटया शहरातील मुली मुंबईत येऊन चित्रपट अभिनेत्री किंवा एखादा मोठा ब्रेक मिळावा याचे स्वप्न पाहत असतात. काही मुलींना कोणतेच कष्ट न करता आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची संधी मिळत असते परंतु अशाही काही मुली आहेत, ज्या कास्टिंग काउच च्या शिकार होतात म्हणजेच मुलींना सांगितले जाते की, तुम्ही आमच्या सोबत काही कॉमप्रोमाइज करणार तर तुम्हाला ही भूमिका देऊ. एक भूमिका मिळवण्याकरीता मुली अनेकदा काही विचार करत नाही आणि कास्टिंग काउच ला बळी पडतात. असेच काही मराठी चित्रपटाची अभिनेत्री हर्षाली जाइन सोबत घडले, जिची कास्टिंग काउच ची कथा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हर्षाली ने असे सांगितले की, हे सारे नेहमी घडत होते, जेव्हा मी एखाद्या भूमिकेसाठी किंवा एखाद्या ऑडिशनसाठी जात असे.
हर्षाली ने सांगितले की जेव्हा ही मी घरून कोणत्या मीटिंगसाठी बाहेर पडायची हे प्रत्येक मीटिंगमध्ये घडत असे. यादरम्यान माझ्यासोबत एक दुर्घटना घडली. एका मोठ्या व्यक्तीने मला अप्रोच केले. मी त्याचे नाव नाही घेऊ इच्छिते. ही घटना माझ्या करीता खूपच हैराण करणारी होती. या व्यक्तीने मला व्हाट्सअप वर मेसेज केला आणि सांगितले की मला तुझ्यासोबत “हे” करायचे आहे. मला समजत नव्हते कि मी यावर काय प्रतिक्रिया देऊ. मी खूप घाबरली होती कारण मला माहिती होते की तो खूप मोठा व्यक्ती आहे आणि त्याचे संबंध हे राजकारणाशी जोडले गेलेले आहेत. जर मी एक सुद्धा चुकीचा शब्द वापरला असता तर मी गेले असते कारण मला याची जाणीव होती की ते असं काहीतरी करण्यास सक्षम आहे. मला या प्रकरणाला अतिशय चतुराईने हाताळणे गरजेचे होते तर मी त्यांना सांगितले की, मी तुम्हाला जरुर भेटेन.

यानंतर त्यांनी मला हॉटेलवर येण्यास सांगून “या” रंगाचे कपडे परिधान करून यायला सांगितले. मला त्या वेळेस काहीच समजले नाही. तो साधारणतः मला रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान फोन करायचा. तो ज्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधायचा त्याचे बोलणे ऐकून मला झोप येत नसे आणि मी थरथर कापत असे. त्याने मला लगातार एक महिना सातत्याने फोन केला यानंतर मी निर्णय घेतला की, मी त्याच्या फोनला उत्तर देणार नाही . मी हे जाणून नव्हते की, ते कोणतेही पाऊल उचलू शकतील म्हणजेच माझे अपहरण किंवा अन्य प्रकारचा गुन्हा. मी त्यांना विचारले की तुम्हाला नेमके काय हवे आहे तर त्याने उत्तर दिले की मी एका नाटकाची निर्मिती करत आहे, ज्यामध्ये मला ते भूमिका देऊ इच्छित आहेत. माझा मेंदू विचार करु लागला की यासाठी अर्ध्या रात्रीची वेळ का निवडली गेली. मी या व्यक्तीसोबत आधीसुद्धा काम केले होते.
त्यांनी मला आपल्या चित्रपटांमध्ये भूमिका देण्याबद्दल सांगितले परंतु म्हणाले की मला एक कॉमप्रोमाइज करावे लागेल.मला तेव्हा समजले नाही की नेमके त्यांना काय म्हणायचे आहे. मी याची कल्पना सुद्धा करू शकणार नव्हती. मी त्यांना सांगितले कि, मला तुमचे बोलणे समजत नाही आहे. मी ही गोष्ट त्यांना इंग्रजीमध्ये सांगितली परंतु त्यांना योग्य पद्धतीने इंग्रजी येत नव्हती कदाचित ते मराठी असल्याकारणाने त्यांना इंग्रजी समजत नसावी म्हणून मी त्यांना हिंदीमध्ये विचारले, तेव्हा त्यांनी म्हटले की भूमिका पाहिजे असेल तर काही ना काही कॉमप्रोमाइज तर करावे लागतील मॅडम . हे ऐकून मला प्रचंड मनस्ताप झाला. त्याने माझ्या करीता बॉलिवूड किंवा मराठी चित्रपटात जर शिफारस केली असती तर कोणीही हो म्हंटले असते एवढा तो शक्तिशाली व्यक्ती आहे. वरील लेख आपल्याला आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *