काही लोकांना जेवताना अधिक मीठ खाण्याची सवय असते. मात्र जास्त मिठाचे सेवन करणे आपल्या आरोग्यास हानिकारक असते हे अनेक जणांना ठाऊक आहे. मिठाच्या अधिक सेवनामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. नुकतेच संशोधनामध्ये समोर आले की मिठाचे अधिक सेवन केल्यास मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते.
भारतीय आहारात सोडियम भरपूर प्रमाणात असते. त्यात अधिक मिनिटांचे सेवा केल्यामुळे आजारांना आमंत्रण दिले जाते. कालांतराने जास्त प्रमाणात मीठाचा वापर केल्यास मूत्रपिंडाला भरपूर नुकसान होऊ शकते. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो ज्याला हायपरटेंशन असे म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या कडक होतात त्यामुळे त्यातून ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो.
संशोधक क्रिश्चियन कुर्ट्स यांनी सांगितले की अधिक मिठाच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते हे आता सिद्ध झाले आहे. सोडियम क्लोराइड चा मानवी शरीरातील इम्यून सिस्टीम वर नकारात्मक परिणाम होतो हे संशोधनात आढळले.त्यांचे संशोधन अविश्वसनीय असल्याचे संशोधकांनी म्हटले कारण आधी केलेले संशोधन उलट दिशेने नेत होते. संशोधनाच्या दरम्यान रोगप्रतिकारकांची कमतरता स्पष्ट दिसून आली. तसेच रोगप्रतिकारक पेशी बॅक्टेरियांशी लढण्यात कमकुवत असल्याचे सिद्ध झाले.
डब्ल्यूएचओ च्या मते वयस्कर व्यक्तींनी एका दिवसात पाच ग्रॅम हून अधिक मिठाचे सेवन करू नये. उच्च रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी जगभरातील संशोधकांनी मिठाचे सेवन कमी करण्यास सांगितले. कारण मिठामुळे ताण तणाव वाढून जीवनशैली नियंत्रित करण्यास अडचणी येतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनने च्या मते प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण दिवसात २,३०० मिलिग्रॅम मिठाचे सेवन केले पाहिजे. ही मात्रा जास्त मीठ खाणाऱ्या लोकांसाठी आहे. परंतु दररोज मीठ सेवन करण्यासाठी १५०० मिलीग्राम हून अधिक मात्र असू नये. परंतु लोक हे प्रमाण मानत नाहीत आणि हाय ब्लडप्रेशरचा शिकार होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *