दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाची इडी आणि सीबीआय कडून सतत चौकशी होत आहे. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आरोपी मानला जाणाऱ्या रिया चक्रवर्ती संबंधी मनी लॉ न्ड्रिं ग च्या केसचा तपास करण्यासाठी गोव्यातील हॉटेल व्यवसायक गौरव आर्याला ताब्यात घेतले आहे.

गौरव आर्याचा गोव्यामध्ये स्वतःचा कॅफे आहे. सोमवारी ३१ ऑगस्टला गौरवला ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. गौरव आर्या गोव्याहून मुंबईला येणार आहे. रियाच्या चॅटमध्ये गौरव आर्याचे नाव आहे. गौरव गोवा एअरपोर्ट वर पहिल्यांदाच मीडियासमोर आला व तो मीडियाला म्हणाला की तो कधीच सुशांत सिंह राजपूत ला भेटला नव्हता.

 

२०१७ मध्ये तो पहिल्यांदा रिया चक्रवर्ती ला भेटलेला. याआधी ईडीची टीम गौरव च्या गोव्यातील अंजूना येथे असलेल्या त्याच्या कॅफेवर गेली होती मात्र त्यावेळी तो तेथे उपस्थित नव्हता. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या हॉटेलवर नोटीस लावून गौरवला ३१ ऑगस्टपर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. एनसीबीने या प्रकरणात ड्र*ग्स अँगल मिळाल्यानंतर याप्रकरणी गौरव वर गुन्हा दाखल केला. मीडिया रिपोर्टनुसार एनसीबीने सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, गौरव आर्य, जया साहा आणि सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात नार्कोटिक ड्र ग्स अँड सा य को ट्रॉ पि क कायद्याच्या कलम २०,२८ आणि कलम २९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाउस मध्ये सलग तिसऱ्या दिवशी सीबीआयचे अधिकारी रियाची चौकशी करत आहेत. याआधी गौरव आर्यच्या वकिलांनी सांगितले होते की त्यांचा आ शी ल ११ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होणार आहे. तसेच चौकशी मध्ये जे काही प्रश्न विचारले जातील त्याला तो उत्तर देईल. गौरवच्या वकिलांनी सांगितले की गौरव वर लागलेले आरोप सगळे खोटे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयची टीम ८ ते १२ जून दरम्यान काय घडले याबाबत सुशांतसिंग राजपूत ची बहिण मितू सिंह यांच्याशी चौकशी करणार आहे. ८ ते १२ जून पर्यंत मितू सिंह सुशांत सोबत राहत होती. मितू व्यतिरिक्त सीबीआय सुशांतची दुसरी बहीण प्रियांका व तिचा पती सिद्धार्थची पण चौकशी करणार आहे. सुशांत ची बहिण व तिच्या पतीसोबत, रिया यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील.
२०१७ मधील रिया व गौरव ची ड्रग्स निगडीत चॅट समोर आल्यानंतर गौरव हाच रियाचा ड्रॉईंग सप्लायर होता असे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *