दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आ*त्म*ह*त्ये*ला दोन महिने उलटून गेले तरीही या प्रकरणाचा गुंता सुटता सुटत नाही आहे. आतापर्यंत या प्रकरणी अनेक गोष्टींचा खुलासा झालेला आहे. पुरुषांच्या आजाराबद्दल व त्याच्या डिप्रेशन बद्दल सुशांतच्या परिवाराला काहीच ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नुकतेच सुशांत च्या बहिणींची व्हाट्सअप चॅट समोर आली ज्यातून सुशांत बहिणींना त्याच्या आजाराबद्दल ठाऊक असल्याचे दिसते. याबाबत आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती चे वकील सतीश मानशिंदे यांनी काही खुलासे केले आहेत.
नुकतेच अभिनेत्री रिया चक्रवर्ती चे वकील सतीश मानशिंदे यांनी दावा केला की, ८ जून नंतर सुशांतच्या बहिणींनी त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल केला होता. यामुळेच रिया चक्रवर्ती सुद्धा त्याचे घर सोडून निघून गेली.

खरेतर सुशांत ची बहिण प्रियांकाने सुशांत साठी काही औषधे सांगितली होती. मात्र सुशांत कडे त्या औषधांचे कोणतेही प्रिसक्रिप्शन मिळाले नाही. ज्या दिवशी रिया सुशांतचे घर सोडून गेली त्यादिवशी चॅट समोर आली आहे. याबाबत अधिक खुलासा करताना रिया चक्रवर्ती चे वकील सतीश मानशिंदे यांनी एका मीडिया हाऊस बोलताना सांगितले की, रियाने तिच्या जबानी मध्ये सांगितले होते की, सुशांत व त्याची बहीण प्रियांका ने एकमेकांशी चॅक केले होते.
रिया नेहमी प्रियांकाने सांगितलेल्या औषधांच्या विरोधात होती. सुशांतने कोणतेही इतर दुसरे औषध घेऊ नये असे रियाला वाटत होते. एवढेच नव्हे तर सुशांतच्या डॉक्टरांनी सुद्धा ती औषधे घेण्यास मनाई केली होती. सतीश यांनी पुढे सांगितले, सुशांतच्या परिवाराने सीबीआय, मुंबई पोलीस आणि सुप्रीम कोर्टा समोर खोटे आरोप केले होते की रियाने सुशांतला चुकीची औषधे आणि ड्र*ग्स दिले.
८ जून ला जेव्हा सुशांत व रिया मध्ये भांडणे झाली तेव्हा सुशांतने तिला घर सोडून जाण्यास सांगितले होते. आतापर्यंत केल्या गेलेल्या चौकशीत रियाने फक्त एवढेच सांगितले होते की,८ जून ला सुशांतने रियाला घराबाहेर जाण्यास सांगितले. परंतु सुशांत व रियाचे भांडण नक्की कोणत्या कारणामुळे झाले हे समजले नव्हते. परंतु आता सुशांत व त्याची बहीण प्रियांकाची चॅट समोर आल्यावर याबाबतीत खुलासा झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *