बॉलीवूड मध्ये खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सोनू सूद खरे आयुष्यात मात्र लोकांसाठी हिरोच्या भूमिकेत वावरतो. लॉक डाऊन च्या काळात सोनू सूद ने अनेक एक गरीब कामगारांना मदत केली होती. लोकांच्या मदतीसाठी सतत हजर असलेला अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर त्याने केलेल्या मुंबई बाबत एका ट्विटमुळे चर्चेत आहे. सध्या त्याचे ते ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्री कंगना राणावत नाही मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असताना सोनू सूद ने असे ट्विट केल्यामुळे जास्त व्हायरल होत आहेत.
सोनू सुदने ट्विट केले की, मुंबई हे असे शहर आहे जे आपले नशिब बदलवते. येथे सलाम केल्यास तुम्हाला समोरून सलामी मिळेल. या ट्विटमध्ये सोनुने जरी कोणाचे नाव घेतले नसले तरी काही युजर्सचे म्हणणे आहे की सोनू सूद ने हा टोला कंगणा राणावतच्या वादग्रस्त विधानाला लगावला आहे.
मुंबई .. यह शहर तक़दीरें बदलता है।
सलाम करोगे तो सलामी मिलेगी। 🇮🇳
— sonu sood (@SonuSood) September 3, 2020
अभिनेत्री कंगना राणावत ने काही दिवसांपूर्वी तिच्या वक्तव्यात मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. कंगना राणावत ने तिच्या ट्विट मध्ये म्हटले की शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मला मुंबई पुन्हा येऊ नकोस अशी खुलेआम ध म की दिली आहे. एकेकाळी या मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या जायच्या आणि आता याच मुंबईत खुलेआम ध म क्या दिल्या जातात. ही मुंबई पाकिस्तान अधिकृत काश्मीर सारखी का वाटू लागली आहे?
https://twitter.com/KanganaTeam/status/1301413968729210880
कंगणाच्या अशा वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. #KanganaPagalHai ट्विटर वर टॉप ट्रेंड सुरू आहे. कंगना राणावत वर सायलेंट अटॅक करण्याची सोनू सूद ची ही पहिलीच वेळ नाही. खरेतर मणिकर्णिका’ या चित्रपटापासूनच सोनू सूद आणि कंगना राणावत मध्ये वाद सुरू झाला होता.
कारण चित्रपटाचे अर्धे चित्रीकरण झाल्या नंतर सोनुने तो चित्रपट मध्येच सोडला होता. त्यानंतर या बाबतीत अनेक प्रश्न समोर येऊ लागले मात्र सोनू सूद ला महिला दिग्दर्शकाच्या अधिपत्या खाली काम करायचे नाही त्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला असे कंगणाचे म्हणणे होते. तर सोनू चे म्हणणे होते कि या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे व कंगना मध्ये काहीतरी बिनसले होते. या चित्रपटाची शूटिंग पुन्हा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु मी त्यांना विचारले की मला कोणत्या भागाची शूटिंग करायची आहे कारण संपूर्ण चित्रपट मी पुन्हा शूट करू शकत नव्हतो.