जगप्रसिद्ध इंदुरीकर महाराज यांनी एक क्रांती घडवून आणली. मध्यंतरी कीर्तन अभंग हे प्रकार लुप्त झालेले परंतु इंदुरीकर महाराजांनी किर्तन आणि अध्यात्म पुन्हा एकदा गावागावात पोहोचवले व ही कला जिवंत ठेवली. महाराजांची प्रबोधन करण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. हेअर स्टाईल काहीजणांना पटते तर काहीजणांना ती बोचक वाटते. आज आम्ही तुम्हाला इंदुरीकर महाराजांबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहीत नसतील.
इंदुरीकर महाराज या नावाने जगप्रसिद्ध असलेल्या महाराजांचे खरे नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. ते ऊझरखुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे राहतात. मात्र ते इंदूरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील मूळ रहिवाशी. इंदुरीकर महाराजांची अनाथांचा नाथ इंदुरीकर महाराज ही ओळख महाराष्ट्रातील फार कमी लोकांना माहीत आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनार माध्यमिक विद्यालय ओझर येथे जे विद्यालय आहे. या विद्यालयात ८५ पेक्षा जास्त विद्यार्थिनी व अनेक अनाथ व निराधार मुलं आहेत. ही शाळा मागील अनेक वर्षांपासून इंदुरीकर महाराज स्वखर्चाने चालवतात. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराज स्वतः बीएसी बीएड आहे आणि याच शाळेत त्यांनी शिक्षकाची जबाबदारी सुद्धा पार पाडलेली आहे.
शाळेत डिजिटल क्लासरूम आहेत. संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द पंचक्रोशीत बंद पडलेले हरिभक्त पारायणाचे सप्ते महाराज स्वखर्चाने करतात. तसेच पंचक्रोशीतील मंदिराचे रंगकाम, मंदिरातील मूर्ती महाराज स्वखर्चाने देतात. इंदुरीकर महाराजांची ओळख विनोदी कीर्तनकार म्हणून केली जाते. इंदुरीकर महाराज अस्तित्वाची जाणीव सत्य स्वरूपाचे दाखले देत व प्रत्यक्षात स्वरूपाचे प्रमाण देत मांडतात म्हणून ते ऐकणार्याला हलकेफुलके वाटावे यासाठी विनोद निर्मिती करतात. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या समाज प्रबोधन पद्धतीचा वापर ते त्यांच्या प्रवचनात करतात. रोखठोकपणा व अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली ही इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाची खरी ओळख मानली जाते. त्यामुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे कीर्तनकार तसेच समाज प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे मूळ गाव त्यामुळे या गावाच्या नावावरूनच महाराजांना इंदुरीकर महाराज म्हणून ओळखले जाते. सध्यकालीन समाजातील कुप्रथांवर कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून महाराज प्रखर टीका करतात. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इंदुरीकर महाराज कीर्तनकारांपेक्षा वेगळे ठरतात. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तमाशा बघणारा माणूस किर्तन बघू लागला आणि विदेशी संस्कृतीचे वेड लागलेली तरुणाई मराठी संस्कृती समोर नतमस्तक झाली ती इंदुरीकर महाराजांच्या मुळे.
सत्य जगासमोर मांडण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी अनेक कीर्तने आजवर केली आहे. मात्र या कीर्तनामध्ये नवरदेवा पुढे पोरी नाचायला सुरुवात केली लग्नात अरे खानदान तपासा आपले कोणते आहे?., पालकांनी जरा आपल्या मुलींचे हात तपासा. बांगडी आहे का बघा कि बुडवला ध*र्म?., गोरी बायको करू नये कारण ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या यांसारखी अनेक विधाने वादग्रस्त ठरल्यामुळे सध्या इंदुरीकर महाराज कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. पण काळाची गरज असलेले निवृत्ती महाराज यांची लवकरच या प्रकरणातून सुटका व्हावी हीच प्रार्थना !