प्रत्येक मुलीच्या आपल्या लग्नासाठी काही अपेक्षा असतात. कुटुंबव्यवस्था भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये लग्नपद्धतील फार महत्त्व दिलेले असते. लग्न जरी दोन व्यक्तींचे असले तरी दोन कुटुंब एकत्र होत असतात. हल्ली जग वेगाने बदलत आहे, त्या वेगवान जगाशी जुळवून घेताना बरेचसे बादल देखील होत आहेत. आजकालच्या तरुण तरुणींचे आपल्या जोडीदाराविषयीचे मत हे आधीच तयार झालेले असते.

गेल्या काही महिन्यात नेटफ्लिक्स वर इंडियन मॅचमेकिंग नावाची सिरिज रिलीज झाली. या सिरिजच्या जगभरात प्रसिद्ध होण्यामुळे इतर देशांना भारतातील ९० टक्के लग्न कशापद्धतीने होतात हे समजले. जे भारतीय नागरिक भारत सोडून कायमचे विदेशात स्थायिक झाले आहेत ते विवाह संस्थांच्या माध्यमातून आपल्या जाती ध’र्मा’चे, गो’त्रा’चे जोडीदार शोधतात. प्रत्येक देशाची, शहराची वेगळी सं’स्कृ’ती, वा’र’सा असतो जो फार काळापासून चालत आलेला असतो.

आपल्या देशात आपले आई बाबा, नातेवाईक आपल्यासाठी एक चांगला वर शोधतात, जो आपल्या जा’ती’ध’र्मा’चा असेल व योग्य वर असेल. पण बाहेरील इतर देशांमध्ये आपले मूल कोणाशी लग्न करेल याचा निर्णय त्याचे पालक घेत नाहीत.

UN Women रिपोर्टच्या मते, आपल्या देशात मुलगे ऑनलाईन स्पेस मध्ये बिलकुल विश्वासपात्र नसल्याचे समोर आले आहे. यूनिवर्सिटी ऑफ मेरीलँड अँड नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकनॉमिक रिसर्च यांनी २०११-२०१२ मध्ये भारतीय मानव विकास या विषयावर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामधून मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये एफकेटी ४.९९% मुलींना आपल्या लग्नसंबंधित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

उर्वरित जवळ जवळ ९५% मुलींच्या लग्नाचे निर्णय कुटुंबाकडून घेतले जातात. परंतु हल्ली ही स्थिति बदलताना दिसत आहे, मुलींना सर्व क्षेत्रात समान वागणूक दिली जात आहे त्यामुळे मुली देखील आता स्वतःच्या पायावर उभ्या रहातात व स्वतःच्या जोडीदाराविषयीचे निर्णय स्वतः घेऊ शकतात.

शादी डॉट कॉम या विवाह संस्थेने हल्लीच केलेल्या एका सर्वेक्षणांनुसार भारतातील ८१% मुली आपल्या लग्नाच्या निर्णयांमध्ये स्वातंत्र्य मागत आहेत. या मुलींनी या सर्वेक्षणादरम्यान संगितले की, आमच्या लग्नाचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ पाहतो आहोत. या सर्वेक्षणामध्ये २५ ते ३४ या वयोगटातील महिलांचा समावेश होता. मुलींच्या उच्च शिक्षण व आर्थिक निरभरतेमुळे हा सुखद व चांगला बदलाव पाहायला मिळत आहे. त्यांच्या या सर्वेक्षणामध्ये कोणताही क्षेत्रवार आकडा नाही.

कोणत्या राज्यात किंवा कोणत्या ग्रामीण शहरी भागामध्ये ही स्थिती आहे या प्रमाणे या सर्वेक्षणाची विभागणी केलेली नाही. परंतु २०१३ च्या एशियन पॉपुलेशन स्टडीजच्या अभ्यासानुसार भारतामध्ये आपला जोडीदार शोधण्याचे स्वातंत्र्य इतर ठिकाणांच्या महिलांच्या तुलनेत दक्षिण भारतातील महिलांना जास्त स्वातंत्र्य आहे आणि उत्तर प्रदेशातील महिलांना फारच कमी स्वातंत्र्य आहे.

शादी डॉट कॉमच्या या सर्वेक्षणांमधून अजूनही काही आकर्षक माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणामध्ये सामील असलेल्या एक तृतीयांश लोकांचा म्हणणं आहे की, लग्न ठरवताना वा बोलणी करताना जर नातेवाईकांचा जास्त हस्तक्षेप असेल तर कोणत्या तरी प्रकारचा द बा व असल्यासारखे वाटते. तर ५४% महिलांनी सांगितले की एखाद्या पारंपारिक रचनेमध्ये कुटुंब, नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये लग्नाबद्दल कोणतीही गोष्ट ठरवताना त्यांना प्रा य व्ह सी मिळत नाही.

नातेवाईकांचा फारच हस्तक्षेप असल्यासारखे वाटते. या सर्वेक्षणामधील पुढील प्रश्न होता की तुझ्या नातेवाईकांची किंवा कुटुंबीयांची कोणती गोष्ट तुम्हाला जास्त खटकते?, यावर 54% मुलींचे उत्तर होते की, तुझ्यासाठी योग्य जोडीदार कोण आहे हे तुझ्या पेक्षा जास्त आम्हाला कळतं ही गोष्ट.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *