या ३० नोव्हेंबरला चंद्र ग्रहण लागणार आहे. चंद्रग्रहण ही एक भौगोलिक घटना असते. जी पृथ्वीच्या कोसोदूर घडते मात्र त्याचे परिणाम मानवी जीवनावर दिसून येतात. मानवी आयुष्य त्यांच्या राशींवर अवलंबून असते. त्यामुळे ग्रहणा वेळी बाहेर पडणारी प्रदूषित किरणे मानवी आयुष्यावर परिणाम करतात.

कुठल्याही ग्रहणाचे गंभीर पडसाद हे गर्भवती महिला आणि लहान मुलांवर दिसून येतात. जे लोक असुरी वृत्तीचे असतात अशा लोकांवर या ग्रहणाचे थेट परिणाम दिसून येतात. काही वेळेस शांत चांगल्या व्यक्तीची मन शांती भंग होऊ शकते. यामुळे या काळात सावधानी बाळगणे आवश्यक आहे. काही लोकांना या काळात भरपूर कष्ट करावे लागणार आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी चंद्र ग्रहण लागणार आहे. वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असेल. चला तर जाणून घेऊ चंद्र ग्रहणा संबंधी माहिती –

चंद्रग्रहण तिथी ३० नोव्हेंबर २०२० – ३० नोव्हेंबर २०२० ला दुपारी १ वाजवून ४ मिनिटांनी चंद्रग्रहण सुरुवात होईल.
परमग्रास चंद्रग्रहण ३० नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी असेल. आणि ३० नोव्हेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५:२२ वाजेपर्यंत हे ग्रहण संपेल.

चंद्रग्रहणाची धार्मिक मान्यता – चंद्रग्रहण महत्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रात चंद्राला मन कारक असे म्हणतात. त्यामुळेच जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा त्याचा थेट परिणाम मनावर होतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चंद्र ग्रहण दोष असेल त्या व्यक्तींवर याचा परिणाम अधिक दिसून येतो.

चंद्र ग्रहणामध्ये चंद्र पाण्याला त्याच्याकडे आकर्षित करून घेतो ज्यामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटांची भरती येते. चंद्राला ग्रहना वेळी अधिक पिडे मधून जावे लागते त्यामुळेच चंद्रग्रहणा वेळी हवन, यज्ञ आणि मंत्रजप केले जातात.

पूर्ण चंद्रग्रहण २०२५ मध्ये दिसेल – संपूर्ण चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ ला पाहायला मिळणार आहे. सामान्यतः एका वर्षात चार ग्रहण लागतात. यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण यांचा समावेश असतो. मात्र काही वेळेस याहून अधिक ग्रहणे सुद्धा लागू शकतात. २०२४ मध्ये ३ चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण लागणार आहेत. असेच ग्रहण २०२७ मध्ये देखील असेल. २०२९ हे वर्ष ग्रहणांच्या दृष्टीने खास असेल कारण त्यावेळेस चार सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत.

२०२० मधील ग्रहणे – पहिले ग्रहण- १० जानेवारी (चंद्रग्रहण), दुसरे ग्रहण- ५ जून ( चंद्रग्रहण), तिसरे ग्रहण- २१ जून (सूर्यग्रहण), चौथे ग्रहण- ५ जुलै (चंद्रग्रहण), पाचवे ग्रहण- ३० नोव्हेंबर (चंद्रग्रहण), सहावे ग्रहण- १४ डिसेंबर (सूर्यग्रहण)

ग्रहण काळात या ठिकाणी जाऊ नका – चंद्र ग्रहण सुरू होण्यापूर्वी १२ तास आधी ग्रहणाचे सुतक सुरू होते. यावेळेस पृथ्वीवर चंद्राचा विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे यावेळी घडणाऱ्या दुष्प्रभावां पासून वाचण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात असे शास्त्रात दिलेले आहे.

चंद्रग्रहणाचे सुतक सुरू होताना स्म’शा’न’भू’मी, किंवा इतर कोणतीही भू’त बाधित जागा, खंडर, ओसाड पडलेली जागा, पडके घर यांच्या आसपास फिरवू नये. कारण या वेळेस वाईट शक्ती अधिक प्रभावित होतात. ज्या तुमच्यावर वाईट प्रभाव पाडू शकतात.

चंद्रग्रहणा पूर्वी आणि नंतर गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी – चंद्रग्रहण वेळी गर्भवती महिला किंवा नुकत्याच बाळाला जन्म देणाऱ्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी. या काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी नाहीतर त्यांच्या पोटातील बाळाच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांवर अशुभ प्रभाव पडतो त्यामुळे या काळात त्या महिलांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो.

या काळात गर्भवती महिलांनी भाजी चिरणे किंवा कापणे अशी कामे करू नयेत. तसेच कपडे शिवणे किंवा कोणत्याही धारदार शास्त्रांचा वापर करू नयेत. यामुळे गर्भातील बाळामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.  ग्रहणाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीचे पान ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुति वाचावी. ग्रहण संपल्यावर त्या महिलांनी शुद्ध जलाने स्नान करावे यामुळे गर्भातील बाळास त्याचे संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

उपच्छाया चंद्रग्रहण म्हणजे काय? ग्रहणाच्या आधी चंद्र पृथ्वीच्या परछायेत प्रवेश करतो त्याला उपच्छाया चंद्रग्रहण असे म्हटले जाते. त्यानंतर चंद्र पृथ्वीच्या खऱ्या छायेत प्रवेश करतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो त्या वेळेस खरे ग्रहण चालू होते. मात्र काही वेळेस चंद्र पृथ्वीच्या खऱ्या सावलीतून न जाता तिच्या उपछायेतून जाऊन बाहेर पडतो.

त्यावेळेस चंद्रावर पृथ्वीची छाया न पडता त्यावर केवळ तिची उपछाया पडते. त्यावेळेस उपछाया चंद्रग्रहण असते. या चंद्रग्रहणात चंद्राच्या आकारात कोणताच बदल घडत नाही. केवळ चंद्रावर पुसट सावली दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *