ज्याप्रमाणे रेल्वेच्या रंगाचा काही अर्थ असतो. रेल्वेवर दिलेल्या नंबर किंवा चिन्हांचा अर्थ असतो तसेच रेल्वेच्या हॉर्नचा सुद्धा अर्थ असतो ! रेल्वे च्या हॉर्न चे ११ प्रकार असतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा अर्थ आणि हे हॉर्न कधी वाजवले जातात ?

१. एक लहान हॉर्न – एक लहान हॉर्न काहीच सेकंदसाठी असतो, याचा अर्थ असा होतो की गाडी यार्डमध्ये जात आहे तेथे पुढच्या प्रवासासाठी या रेल्वेगाडीची साफसफाई केली जाईल.

२ दोन लहान हॉर्न – रेल्वे मध्ये दोन लहान हॉर्न तर तुम्ही जरुरी ऐकला असणार. दोन लहान हॉर्न वाजण्याचा अर्थ असा होतो की, रेल्वे चालण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा हॉर्न यात्रेकरूंना सावधान करण्यासाठी असतो कारण जर एखादा रेल्वे प्रवाशी बाहेर इकडे तिकडे गेलेला असेल तर तो पुन्हा रेल्वेत येऊ शकतो आणि त्याला यामुळे रेल्वे सुरू होणार आहे याची सुद्धा कल्पना येते.

३. तीन लहान हॉर्न – तीन लहान हॉर्नचा वापर रेल्वेमध्ये खूप कमी वेळा केला जातो. याला आपण संकट समयी वाजविला जाणारा हॉर्न सुद्धा म्हणू शकतो. तीन लहान हॉर्न फक्त मोटरमनच वाजवू शकतो. याचा अर्थ असा होतो की लोकोपायलट इंजनने आपला कंट्रोल त्याने गमावलेल्या आहे. लोको पायलट या हॉर्न द्वारे गार्डला संकेत देतो की तो व्याक्युम ब्रेकने रेल्वेला थांबवावे.

४. चार लहानहॉर्न – रेल्वे चालताना जर थांबते आणि चार वेळा लहान होऊन वाचतो तर याचा अर्थ असा होतो की इंजनमध्ये कोणती तरी समस्या निर्माण झालेली आहे आणि या कारणामुळे गाडी पुढे जाऊ शकत नाही किंवा पुढे कोणती तरी दुर्घटना झालेली आहे, ज्या कारणामुळे रेल्वे ते पुढे जाऊ शकत नाही.

५. एक मोठा आणि एक लहान हॉर्न – एक मोठा आणि एक लहान हॉर्न याचा अर्थ असा होतो की, मोटर मॅन गाईडला संकेत देत आहे की इंजिन स्टार्ट होण्याआधी तो ब्रेक पाईप सिस्टमला सेट करावे.
६. दोन मोठे दीर्घ आणि दोन लहान हॉर्न – जर मोटरमॅन दोन मोठे दीर्घ आणि दोन लहान वाजवत असेल तर लोकोपायलट गार्डला इंजिनवर बोलवण्याचे संकेत देत आहे.

७. सातत्याने मोठा हॉर्न – जर रेल्वेचा ड्रायव्हर सातत्याने मोठा हॉर्न वाजवत असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की किती रेल्वे प्लॅटफॉर्मवर नाही थांबणार म्हणजेच रेल्वे गंतव्यसाठी सरळ जाईल.या हॉर्न द्वारे प्रवासी यांना सूचित केले जाते की ट्रेन रेल्वे कोणत्या स्थानकावर थांबणार नाही.

८.थांबून थांबून दोन वेळा हॉर्न – दोन वेळा थांबून थांबून हॉर्न वाजवण्याचा अर्थ येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी संकेत देणारा ठरतो की रेल्वे क्रॉसिंगद्वारे जाणार आहे, जर कधी पुढच्या वेळी तुम्ही रेल्वे क्रॉसिंगला उभे असल्यास या गोष्टीकडे लक्ष द्या.
९. दोन लांब आणि एक लहान हॉर्न – याप्रकारचा हॉर्न रेल्वेच्या अंतर्गत कार्यप्रणालीच्या दरम्यान वाजवला जातो, जर जर तुमच्या प्रवास करण्याच्या दरम्यान दोन लांब आणि एक लहान हॉर्न वाजला तर समजा की ट्रेन ट्रॅक बदल करण्यात आहे.

१०. दोन लहान आणि एक दीर्घ मोठा हॉर्न – जर रेल्वेच्या ड्रायव्हर कडून दोन लहान आणि एक दीर्घ हॉर्न देण्यात आला असेल तर याचा अर्थ असा होतो की रेल्वेमध्ये कोणीतरी एमर्जन्सी चैन खेचलेली आहे किंवा गार्डने व्याक्युम ब्रेक लावलेला आहे.
११. सहा वेळा लहान हॉर्न – लोको पायलट द्वारे अशा प्रकारचा हॉर्न कमीच वेळा वाजवला जातो.ड्रायव्हर तेव्हा हा हॉर्न वाजवतो जेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवत असतो. रेल्वे मध्ये बसलेल्या प्रवासीना सतर्क होणे गरजेचे आहे.

ही होती काही महत्वपूर्ण माहिती जेव्हा तुम्ही पुढच्यावेळी रेल्वेद्वारे तुमचा प्रवास कराल, तेव्हा या गोष्टींना लक्षात जरूर ठेवा आणि ड्रायव्हर कडून वाजवण्यात आलेल्या प्रत्येक हॉर्न बद्दल सतर्कता ठेवा आणि जाणून घ्या की ड्रायव्हर नेमका कोणता संकेत देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *